देवेंद्र कोलटकर, झी 24 तास, मुंबई : कोरोनामुळे आवश्यक असेल तरच काळजी घेऊन घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. विकेण्डला बाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर थांबा. कारण लोकल मार्गावर जम्बो मेगाब्लॉक वेगवेगळ्या कामांसाठी घेण्यात येत आहे.
मध्ये रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेवर ठाणे-कळव्या धीम्या मार्गावर 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. नवीन टाकलेल्या रूळांचे (ट्रॅक) कट आणि कनेक्शन आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी, मध्य रेल्वे ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर ३६ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात आला आहे.
शनिवारी दुपारपासून हा ब्लॉक सुरू होईल जो रविवारी संपणार आहे. मात्र हा ब्लॉक वेगवेगळ्या स्थानकांसाठी वेगळा असणार आहे. शनिवारी दुपारी 2 ते सोमवारी दुपारी मध्यरात्री 2 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक असणार आहे.
कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या आणि सेमीफास्ट गाड्या कल्याण ते माटुंगा दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत पुढे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर लोकल धीम्या आणि जलद मार्गावरील लोकल अप जलद मार्गावरून वळवल्या जातील. ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर 10 मिनिटं उशिराने गाड्या येणार आहेत.
ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बसेस चालवण्याची व्यवस्था केली आहे.
कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून चढणाऱ्या प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण लोकलमधून प्रवास करावा. संपूर्ण ब्लॉक कालावधीत डोंबिवलीतून सुटणा-या/टर्मिनेट होणारी उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील.
12112 अमरावती- मुंबई एक्सप्रेस
12140 नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
17611 नांदेड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस
11007 / 11008 मुंबई -पुणे -मुंबई डेक्कन एक्सप्रेस
12071 / 12072 मुंबई-जालना - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
12109 /12110 मुंबई- मनमाड- मुंबई पंचवटी एक्सप्रेस
11401 मुंबई- आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस
12123 /12124 मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीन
12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस
12139 मुंबई -नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
11139 मुंबई - गदग एक्सप्रेस
17612 मुंबई- नांदेड राज्यराणी एक्सप्रेस