सिद्धार्थ श्रॉफ प्रत्यक्षदर्शीने सांगितला अग्नितांडवाचा प्रसंग

लोअर परेलच्या अग्नितांडवात वन अबाऊ या रेस्टॉरंटला देखील आग लागली. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 29, 2017, 07:57 PM IST
सिद्धार्थ श्रॉफ प्रत्यक्षदर्शीने सांगितला अग्नितांडवाचा प्रसंग  title=

मुंबई : लोअर परेलच्या अग्नितांडवात वन अबाऊ या रेस्टॉरंटला देखील आग लागली. 

या आगीत होरपळलेला प्रत्यक्षदर्शी सिद्धार्थ श्रॉफ याच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचित केली. नेमका काय प्रकार घडला याची माहिती त्यांनी दिली. रात्री 12.30 च्या सुमारास श्रॉफ आपल्या कुटुंबियासोबत वन अबाऊ या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. तेव्हा छतावरून आग लागायला सुरूवात झाली. सुरूवातीला नेमकं काय झालं हे कुणालाच कळलं नाही. पण आगीच्या लाटा बघताच सगळेजण इथे तिथे पळू लागले. 

बाहेर पळून जाण्यासाठी सगळे एक्झिटकडे गेले. मात्र तेथील रस्ता अरूंद असल्यामुळे सगळ्यांना बाहेर पठण कठिण होत होतं. आणि आग वाढतच होती. त्यामुळे काही जण जीव वाचवण्यासाठी वॉशरूममध्ये जात होते. आणि तेच लोकं तिथे अडकले. आणि त्यांच्या तेथे गुदमरून मृत्यू झाला. परिस्थिती खूप गंभीर होती. बाहेर पडण्याचा मार्ग कुठूनच सापडत नव्हता. त्यामुळे अधिक गोंधळ झाला. 

या प्रसंगाने मी आणि माझे कुटुंबिय सर्व व्यक्ती घाबरलो आहे. आम्ही मृत्यू अगदी जवळून पाहिला आहे. हा प्रसंग सांगतोय, आगीतून बचावलेला प्रत्यक्षदर्शी सिद्धार्थ श्रॉफ.