मुंबई: शिवसेना-भाजप या सत्ताधारी मित्रपक्षांमधील संघर्ष आता स्थानिक पातळीवरही तीव्र झाल्याचे चित्र आहे. गोरेगावच्या टोपीवाला मंडईत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले. मंडईच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी हा प्रकार घडला. या कार्यक्रमास शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित राहणार होते. मंडईच्या उद्धाटन कार्यक्रमात श्रेयवादावरून लढाई झाल्याचे समजते.
दरम्यान, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाला वेगळे वळण मिळू नये यासाठी पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, घाटकोपरच्या साईनाथ नगर मध्ये पालिकेचे मातोश्री रमाबाई ठाकरे पालिका रुग्णालयच्या नुतनीकरणाचं भूमिपूजन किरीट सोमय्या यांच्या हस्ते होणार होतं. तेव्हा स्थानिक शिवसैनिकांनी या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला होता. त्यावेळीही या विभागात तणावाची स्थिती झाली आहे. मोठ्या प्रमाणत पोलिसांनी इथे बंदोबस्त तैनात केला होता.