Santacruz-Chembur Link Road: सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) विस्तार प्रकल्पाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या रस्त्यावर अभियांत्रिकीच्या दृष्टीने सर्वात किचकट असलेल्या वाकोला ब्रिजवरील आर्थोपेडिक स्टील डेक (ओएसडी) उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
आशियातील 100 मीटर अतिशय तीव्र वळण असलेला हा पहिलाच पूल ठरणार आहे. हा पूल एकूण 215 मीटर लांबीचा आहे. हा एक अभियांत्रिकी चमत्कार असून, यामुळे मुंबईच्या पूर्व-पश्चिम जोडणीला अधिक वेग मिळणार आहे. नवी मुंबई, पुर्व द्रुतगती मार्ग (EEH)आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) कडून विमानतळापर्यंत उत्तम जोडणी निर्माण करण्यासाठी या महत्वाच्या प्रकल्पावर एमएमआरडीए कार्यरत आहे.
एससीएलआर रस्त्याच्या सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला पुलापर्यंत विस्तार केला जात आहे. आता अंतिम टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्ग दहिसरशी जोडण्यासाठी केबल स्टेड ब्रिज उभारण्यात येत आहे. हा पूल आर्थोपेडिक स्टील डेक स्वरुपातील असून पश्चिम द्रुतगती मार्गावर त्याचे तीव्र वळण आहे.
एमएमआरडीएने या पुलावर वाकोला येथे स्टील डेक उभारून आव्हानात्मक काम पूर्ण केले आहे. आता यावर केबल उभारणीचे आणि रस्त्याच्या क्राँक्रिटीकरणाचे काम केले जाईल. त्यामुळं या पुलाची अंतिम टप्प्यातील कामे पुढील दोन ते तीन महिन्यांत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे.
एसएसीएलआरचा शेवटचा टप्पा असलेला हा मार्ग मे 2025 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे. या पुलामुळं कुर्ला येथून एससीएलआरवरुन येणाऱ्या वाहनांना थेट पश्चिम द्रुतगती मार्गावरील विमानतळानजीक पोहोचता येणार आहे.
-आशियातील पहिला केबल-स्टेड ब्रिज, ज्यामध्ये 100 मीटरचा तीव्र वळण आहे
-पश्चिम द्रुतगती महामार्गावरून 25 मीटर उंचीवर
-कुर्ला ते पनबाई आंतरराष्ट्रीय शाळेपर्यंत अखंड जोडणी
-अनोखी Y-आकाराची पायलॉन रचना, जी संरचनेला अधिक मजबुती देते
-दोन-लेन रस्ता, जो वाहतुकीला अधिक सुकर करतो