ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आंदोलकांनी रोखून धरला

भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद आज उमटायला सुरुवात झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 3, 2018, 11:49 AM IST
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आंदोलकांनी रोखून धरला title=

मुंबई : भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद आज उमटायला सुरुवात झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

घाटकोपरमध्ये रमाबाई कॉलनी आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूकीवर परिणाम झाला आहे. आंदोलकांनी वाहतूक रोखून ठरली आहे. पोलिसांचा सकाळपासूनच मोठा बंदोबस्त या भागात ठेवण्यात आला होता. मंगळवारी देखील याच ठिकाणी वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. याच ठिकाणी आज पुन्हा रास्ताकोरो करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक ही बंद आहे.

रमाबाई आंबेडकर नगर परिसरात जमलेल्या जमावाची समजूत काढून त्यांना पांगविण्यात काही वेळापूर्वी पोलिसांना यश आलं होतं. पण आता येथे मोठ्या प्रमाणात आंदोलक उपस्थित आहेत. रस्ता रोखून धरण्यात आला आहे.