आरक्षित डब्ब्यांमधून मर्यादेपेक्षा जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाच लक्ष असणार आहे.
Updated: Jun 3, 2018, 04:57 PM IST
मुंबई : आरक्षित डब्ब्यांमधून मर्यादेपेक्षा जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाच लक्ष असणार आहे. ८ ते २२ जूनला एक अभियान चालवून याबद्दल जनजागृती केली जाणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास तुम्हाला दंड लागू शकतो याबद्दल माहिती देण्यात येणार आहे. कोणत्या आरक्षित डब्ब्यातून किती सामान नेता येणार याबद्द माहिती सांगण्यात येणार आहे.नोंद न करता सामान आणल्यास कारवाई करण्यात येणार आहे. जास्त सामान नेल्याने इतर सहप्रवाशांना त्याचा त्रास होते. सिझनमध्ये स्लीपर कोच किंवा थर्ड एसीमध्ये जास्त सामान नेल्यास गॅलरी ब्लॉक होते.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.