'मॅग्नेटिक महाराष्ट्र' उद्घाटनातही उद्धव ठाकरेंना डावललं

रविवारी होणाऱ्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्रा'च्या उद्घाटन कार्यक्रमाचेही निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 17, 2018, 08:01 PM IST
'मॅग्नेटिक महाराष्ट्र' उद्घाटनातही उद्धव ठाकरेंना डावललं title=

मुंबई : रविवारी होणाऱ्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्रा'च्या उद्घाटन कार्यक्रमाचेही निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले नाही.

यापूर्वी, २०१६ मध्ये झालेल्या 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाचे निमंत्रणही ठाकरे यांना देण्यात आले नव्हते. तेव्हा शिवसेना - भाजपामध्ये मानापमान नाट्य रंगले होते.

त्यापूर्वी इंदू मिलमध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमातही उद्धव ठाकरेंना निमंत्रण नसल्याने शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.