नोकरी गेल्यानंतर चोरी.. ती चक्क विमानातून फिरायची

हायप्रोफाईल (High profile) राहणीमान (Living standards) सुटत नसल्याने एका महिलेने चोरीचा मार्ग अवलंबला.  

Updated: Dec 19, 2020, 05:53 PM IST
नोकरी गेल्यानंतर चोरी.. ती चक्क विमानातून फिरायची  title=

मुंबई : हायप्रोफाईल (High profile) राहणीमान (Living standards) सुटत नसल्याने एका महिलेने चोरीचा मार्ग अवलंबला. आरोपी महिला ही गाण्यांचे कार्यक्रम करत होती. मात्र लॉकडाऊन (Lockdown) काळात ती बेरोजगार झाली. त्याल नोकरी मिळत नसल्यानं तीनं चोरीचा मार्ग अवलंबला. तिने मुंबईसह  (mumbai) बंगळुरु, राजस्थान, हैदराबाद येथील मोठमोठ्या शोरुम्समध्ये महागड्या साहित्यांची चोरी केली.

लोअर परळ परिसरातील फिनिक्स मॉलमध्येही तिने एका महिलेची बॅग चोरली होती. यामध्ये बारा लाखांचे सोन्याचे दागिने आयफोन मोबाइल आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी महिलेला मंगळुरुतून अटक करण्यात आली.

मुंबईत निवृत्त कर्मचाऱ्यांचे फसवणूक रॅकेट 

बेरोजगार युवकांची फसवणूक (fraud) करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी (mumbai Police) अटक केली. (Mumbai Municipal Corporation employees, job lure and fraud) मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) चतुर्थ श्रेणी विभागात काम मिळवून देतो असे सांगत चारशेहून अधिक बेरोजगारांकडून लाखो रुपये या टोळीने लाटले. 

अटक केलेल्या तिघांपैकी एक प्रकाश सदाफुले हा बीएमसीचा निवृत्त कर्मचारी आहे, दुसरा नितीन धोत्रे चतुर्थ श्रेणी विभागात कार्यरत आहे, तर तिसरी आरोपी प्रीती टाकर निवृत्त पोलीस कर्मचारी आहे. २०१७ पासून हे रॅकेट सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. तर काही तरुणांना नियुक्तीपत्र दिल्याचंही उघड झाले आहे. त्यांना २२ तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.