Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्यानं काढता पाय घेतला आणि उन्हाळा सुरु झाला. फेब्रुवारीपासूनच महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातच तापमानाचा आकडा वाढू लागला. (Mumbai Heat wave) मुंबईला तुलनेनं या उन्हाच्या ळा अधिकच तीव्रतेनं जाणवल्या. पण, गेल्या काही दिवसांपासून इथंही तापमानाच काहीसे चढ ऊतार पाहायला मिळत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण, दुपारच्या वेळी तीव्र होणारा सूर्यप्रकाश आणि त्यामुळं जाणवणारा उकाडा ही सर्व परिस्थिती पाहता सध्या मुंबईकर या हवामान बदलांमुळं बेजार झाले आहेत. (Mumbai Rain update imd issues alert about rain and hailstorm maharashtra latest Marathi news)
मुंबईत आज सकाळपासूनच काही भागात पाऊस सुरू झाला आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली, दहिसर परिसरात सकाळपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. तर ठाणे जिल्ह्यातही बदलापूर, अंबरनाथ भागात पहाटेपासून पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे ऑफिसला जाणा-यांची तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ हवामान आहे. मात्र आज सकाळपासून काही भागात पाऊस सुरू आहे. दादर परळ परिसरात ढगाळ हवामान आहे.
मुख्य म्हणजे महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसाचे पडसाद या शहरावरही दिसून येऊ लागले आहेत. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तिन्ही दिवसांना मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. हवामान विभागाच्या माहितीनुसार काही भागांमध्ये ढगांचा गडगडाटही झाला. पण, पावसाचं प्रमाण इतकं कमी होतं, की ते कोणत्याही परिमाणात मोजणंही अशक्य होतं (Mumbai Rains).
हवामान अभ्यासकांच्या मते मुंबईत झालेला हा पाऊस कोरड्या आणि दमट वाऱ्यांच्या एकत्र येण्यामुळं झाला असून, पुढील तीन ते चार दिवस मुंबईत वातावरणात कोणतेही बदल नोंदवण्यात येणार नाहीत. मागील काही दिवसांत राज्यात वाढणारं तापमान पाहता त्यामुळं बाष्पीभवनाची प्रक्रिया होऊन राज्यातीस बहुतांश भागांमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळाल्याचं तज्ज्ञांचं मत.
दरम्यान, हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी केलेल्या एका ट्विटनुसार बुधवारी रात्रीच्या सुमारास महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, तेलंगाणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश आणि गुजरात या भागांवर ढगांची चादर दिसून आली. उपग्रहाच्या माध्यमातून टीपण्यात आलेल्या या छायाचित्रानुसार या भागात पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
latest satellite obs 15 Mar, 10.20 pm
scattered mod intensity clouds spread over most parts of Interior #Maharashtra, #Mumbai & around, parts of #CoastalAP, #Telangana, #TamilNadu, #Karnataka, #Kerala, #Odisha, #MP, #Gujarat.
Possibility of light to mod rains next 2, 3 hrs pic.twitter.com/TYNV1tK1kk— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 15, 2023
Garancha paus in pachgani ... pic.twitter.com/4qygBM3CEc
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 15, 2023
तिथे साताऱ्यातही बहुतांश भागांना अवकाळी पावसाची वेगवेगळी रुपं पाहायला मिळाली. तर, (Panchgani) पाचगणीत गारांचा पाऊस झाला. सध्याच्या घडीला पाचगणीमध्ये तापमान काही अंशांनी कमी झालं असून, तिथं आलेल्या पर्यटकांसाठी हे वातावरण आनंद देऊन जात आहे. पण, बळीराजाच्या जीवाला मात्र या अवकाळी पावसामुळं धास्ती लागली आहे.
हवमानात सातत्यानं होणारे बदल पाहता IMD कडून नागपूर विभागात येणाऱ्या सर्वच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय राज्यात नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर भागांना 16 ते 17 मार्च रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यानच्या काळात वादळी वारे आणि गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आलीये.
तिथे कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. भुदरगड तालुक्यातल्या गारगोटीमध्ये मुसळधार पाऊस पडल्यानं, मैदानं आणि नाल्यांना तळ्याचं स्वरूप आलं. तर, जनजीवनही विस्कळीत झालं. शेतकऱ्यांना या पावसामुळं मोठा फटका बसला आहे.