मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने आर्थिक गुन्हे शाखेतील 13 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (Mumbai Police: 13 officers with EOW for over 5 years transferred) सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) अंतर्गत बदल्यांचे सत्र सुरु आहे. गुन्हेशाखेतील ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर सोमवारी आयुक्त हेमंत नगराळे (police commissioner Hemant Nagrale) यांनी आर्थिक गुन्हे शाखेतील 13 अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. (Transfer of 13 officers of Maharashtra Home Department Economic Crime Branch)
आर्थिक गुन्हे शाखेतील बदल्या केलेले अधिकारी 5 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी कार्यरत होते, असे सांगण्यात येत आहे. राज्याच्या पोलीस दलाच्या प्रशासकीय विभागाने जारी केलेल्या बदल्यांच्या आदेशात आयुक्त स्तरावरील आस्थापना मंडळाने अपवादात्मक परिस्थितीत आणि प्रशासकीय निकडीनुसार कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या बदल्या केल्याचे म्हटले आहे.
बदल्या करण्याता आलेल्यांमध्ये पोलीस निरीक्षक दिलीप देशमुख (विशेष शाखा), जितेंद्र मिसाळ (संरक्षक व सुरक्षा), विनोद भालेराव (विशेष शाखा), बळीराम धस (वाहतूक), कुंडलिक गाढवे (संरक्षण व सुरक्षा), किरण जाधव (दक्षिण प्रादेशिक विभागाचे सायबर पोलीस ठाणे), सहायक निरीक्षक चंद्रशेखर गायकवाड (वाहतूक), विक्रांत शिरसाठ (एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे), संदीप बडगुजर (वडाळा टीटी), दीपक कदम (मानखुर्द), प्रवीण फणसे (भांडुप), महेश तांबे (पंतनगर), धनंजय देवडीकर (शिवाजीनगर) यांचा समावेश आहे.