Mumbai News : सोशल मीडियावर क्षणाक्षणाला काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा या सोशल मीडियावर सध्या काही अशी दृश्य समोर आली आहेत जी पाहून अनेकांनाच धक्का बसला आहे. कारण, मुंबईतील उच्चभ्रू म्हणवल्या जाणाऱ्या एका वस्तीमध्ये घडलेला हा सर्व प्रकार अनपेक्षित असून, सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारा आहे.
X च्या माध्यमातून नुकतंच श्रेष्ठ पोद्दार नावाच्या एका अकाऊंटवरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले. या व्हिडीओमध्ये दिसणारी दृश्य अनेक प्रश्न उपस्थित करुन जात आहेत. किंबहुना हा असा प्रकारही घडू शकतो, हाच मोठा प्रश्न व्हिडीओ आणि फोटो पाहणाऱ्यांच्या मनात घर करत आहे. एका प्रतिष्ठीत माध्यम समूहाच्या आणि सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार एका निवासी इमारतीमध्ये दोन तरुणी आल्या आणि फ्लॅटची/घरांची दारं बाहेरुन कड्या लावून बंद करत सर्वांच्याच Door Bell वाजवण्यास सुरुवात केली.
श्रेष्ठनं ट्विट केलेल्या माहितीनुसार, 'रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास दोन तरुण, सुशिक्षित मुली शनिवारी रात्री सोसायटीमध्ये आल्या आणि त्यांनी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक घरं बाहेरून बंद करत त्यांच्या दारावर असणारी घंटी वाजवली. माझ्या इमारतीमध्ये 55 वर्षांहून अधिक वयाचे आणि इतरही अनेक ज्येष्ठ नागरिक असून, इथं भूतकाळात काही गैरप्रकार घडले आहेत. बरं, त्या मुलींना आपण सीसीटीव्हीच्या नजरेत आहोत याचीसुद्धा कल्पना होती'.
स्थानिक रहिवासी असणाऱ्या श्रेष्ठ पोद्दारच्या माहितीनुसार जुहू परिसरातील या भागामध्ये यापूर्वी चोरी, आग लागण्याच्या घटना आणि हत्या, तत्सम अनेक प्रकार घडले आहेत. इमारतीतील लोकांना या घटनांमुळं अनेकदा सुरक्षित राहण्यासाठी कंपाऊंड गाठावं लागलं आहे.
2.30 am last night. 2 young, educated girls entered & recorded themselves trying to lock the doors & ring the bells of houses multiple times, in my building, which has mostly 55+ & senior residents, & a history of previous incidents. They knew CCTVs were present. (Contd.) pic.twitter.com/u4sKbJyDzU
— Shresht Poddar (@shreshtpoddar) January 28, 2024
दरम्यान, या दोन तरुणींनी सतत Door Bell वाजवण्यास सुरुवात केली असता घरात असणाऱ्या नागरिकांना धडकी भरली. सीसीटीव्ही व्हिडीओ पाहिला असता CCTV चा बिघाड समोर आला पण तो दुरुस्त होताच श्रेष्ठच्या समोर या दोन तरुणींच्या कुरापती आल्या आणि तोसुद्धा हैराण झाला. घडला प्रकार अतिशय गंभीर असून, त्यामध्ये लक्ष घालण्याचं आवाहन श्रेष्ठनं मुंबई पोलिसांना केलं आहे. आता या प्रकरणी पोलीस यंत्रणा नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.