Mumbai Woman Death: मुंबईतून एक खळबळ घटना समोर आली आहे. मरीन ड्राईव्ह येथील ट्रायडेंट हॉटेलच्या 27व्या मजल्यावरील हॉटेलच्या खोलीत महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेचे नाव विनंती असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे हॉटेल परिसरात तणावाचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करत पोलिसांनी केली आहे. तसेच मरिन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मृत महिला विनंती हिला स्किझोफ्रेनिया नावाचा आजर होता. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. दिवसभर हॉटेल रुममध्ये विनंती यांनी काहीच मागवले नाही तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. यानंतर ट्रायडेंट हॉटेल त्यानी पाहणी केली असता महिला तिच्या खोलीत मृत अवस्थेत आढळली.