Mhada Lottery 2023 : म्हाडाकडून अखेर शुभारंभ; आज हक्काच्या घरासाठी उचला पहिलं पाऊल

Mhada Lottery 2023 : हाच तो दिवस! गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्हीही हक्काचं घर खरेदी करण्याच्या प्रयत्नांत आहात का? आज अखेर तो दिवस उजाडलाय....

Updated: Jan 5, 2023, 07:04 AM IST
Mhada Lottery 2023 : म्हाडाकडून अखेर शुभारंभ; आज हक्काच्या घरासाठी उचला पहिलं पाऊल title=
mhada lottery 2023 registration process and online updates for dream home thursday onwards latest marathi news

Mhada Lottery 2023 : (Maharashtra Housing ) महाराष्ट्र हाउसिंग एरिया डेवलपमेंट अथॉरिटी अर्थात म्हाडाकडून आजवर अनेकांचं हक्काचं घर मिळवण्याचं स्वप्न साकार केलं आहे. (Mumbai) मुंबई, कोकण आणि इतर कोणत्याही भागांमध्ये आजवर अनेक सोडतींमध्ये बहुसंख्य इच्छुकांनी आपल्या सोयीप्रमाणं घरं खरेदी केली आहेत. तुम्हीही वयाच्या अमुक एका टप्प्यावर आता स्वत:चं घर घेण्यासाठी प्रयत्नशील असाल, तर म्हाडानं (Mhada) पुन्हा एकदा एक नवी आणि तितकीच सोपी संधी तुमच्यासाठी आणली आहे. ज्याची पहिली पायरी चढण्याचा शुभारंभ म्हणजेच अर्जासाठी नोंदणी प्रक्रिया आज (गुरुवार 5 जानेवारी 2022) पासून होत आहे. त्यामुळं हक्काचं घर हवंय? तर हा शुभारंभाचा मुहूर्त चुकवू नका.  

कशी असेल अर्जासाठीची नोंदणी प्रक्रिया? 

म्हाडाकडून मुंबई मंडळासाठी आता कायमस्वरूपी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. याअंतर्गत अर्जदारांना फक्त एकदाच नोंदणी करत म्हाडाच्या कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करणं सहज शक्य होणार आहे. या नोंदणी प्रक्रियेची गुरुवार, 5 जानेवारी म्हणजेच आजपासून म्हाडाच्या संकेतस्थळावर (Mhada Lottery online process) होणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या एका दिवसात दोन मोठ्या घोषणा; पुण्यात 5 हजार 966 घरांची जम्बो लॉटरी निघणार

(Mhada Lottery 2023 online form) नोंदणी करत असताना इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं अनिवार्य असेल. ज्यानंतरच अर्जदार सोडतीसाठी पात्र असतील. या प्रक्रियेनंतर सोडतीसाठी अर्ज केल्यास आणि विजेत्यांमध्ये नाव आल्यास त्या अर्जदारांना घराचा तात्काळ ताबा मिळणार आहे. 

कोणती कागदपत्र आवश्यक? 

नोंदणी करतेवेळी अर्जदार/ इच्छुकांन पॅनकार्ड (Pancard), आधारकार्ड (adhar card), उत्पन्नाचा दाखला (income certificate) आणि निवास दाखला (Domicial Certificate) या महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. आरक्षित प्रवर्गातील इच्छुकांना इथं जातीचा दाखला (Cast Certificate) आणि गरज भासल्यास नॉन क्रिमेलियर सादर करावं लागणार आहे.  

म्हाडाच्या घरासाठीची नोंदणी अॅपवरून शक्य 

म्हाडाकडून घरासाठीची नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी सध्या एका अॅपची निर्मिती केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून इच्छुक अगदी हातातल्या मोबाईलवरूनही या प्रक्रियेला सुरुवात करु शकणार आहेत. इथंही ऑनलाईन पद्धतीनं आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची अट मात्र लागू असणार आहे. तेव्हा आता हे अॅप नेमकं कधी सुरु होतंय याकडेही अनेकांच्याच नजरा आहेत. कारण, नोंदणी आणि अर्जाव्यतिरिक्त आगामी सोडती आणि इतर महत्त्वाची माहितीही तिथं उपलब्ध असणार आहे.