Measles Outbreak In Mumbai: मुंबई शहर आणि परिसरात एका गंभीर आजाराचा फैलाव होत आहे. गोवर सारखा हा आजार आहे. लहान मुलांमध्ये आढळणारा एक गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे. दरम्यान, गोवरसाठी लसीकरण भारतात केले जात आहे. मात्र, सध्या हा आजार नेमका काय आहे, याचे कारण केंद्र सरकार आरोग्य विभागाची टीम शोधणार आहे.
मुंबईत Measlesचा उद्रेक होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने 3 सदस्यीय पथकाची स्थापना केली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत आजकाल Measlesची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे उपसंचालक डॉ. अनुभव श्रीवास्तव हे केंद्रीय टीमचे प्रमुख असतील. याशिवाय लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे एक डॉक्टर आणि पुणे येथील आरोग्य मंत्रालयाच्या राज्य कार्यालयातील एका तज्ज्ञाचा या टीममध्ये समावेश आहे.
ही टीम अनेक ठिकाणी भेटी देईल. हा आजार अचानक का पसरत आहे हे समजून घेईल. मुंबईतील Measlesच्या वाढत्या प्रकरणांचे व्यवस्थापन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाय, व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम आणि काय काळजी घ्यावी यादृष्टीने मार्गदर्शन करेल. Measlesच्या उद्रेकाची तपासणी करण्यासाठी आणि राज्याच्या आरोग्य विभागांना मदत करण्यासाठी ही टीम बाधित ठिकांणाना भेटी देणार आहेत.
Measles हा मुलांमध्ये आढळणारा एक गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे. जरी गोवरसाठी लसीकरण भारतात केले जाते आणि सध्या हा रोग वेगाने पसरताना दिसत नाही. खोकला, शिंकणे किंवा संक्रमित व्यक्तीच्या त्वचेच्या संपर्कात आल्याने देखील गोवर पसरतो.
Measles (खसरा ) हा एक गंभीर आणि जिवाला धोका पोहोचविणारा आजार आहे. खोकणे आणि शिंक यामुळे या आजाराचा फैलाव होतो. लहान मुलांना याचा जास्त धोका असतो. त्यांच्यापासून दुसऱ्या मुलांना हा आजार जडतो. या आजारामुळे गंभीर कुपोषण, निमोनिया आणि मेंदुला ताप चढतो. शरीरावर लाल डाग दिसतात, नाक वाहत राहते. डोळे येणे ही याची लक्षणे आहेत.
दरम्यान, कोरोना आणि इतर संसर्गाचे आजार पसरत असताना आता मुंबईकरांवर आणखी संकट उभे राहिले आहे. कारण गोवंडी भागात गोवर साथीच्या आजाराचा उद्रेक पाहायला मिळत आहे. यामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 48 तासात 3 मुलांचा गोवरमुळे मृत्यू झालाय. यामुळे आता मुंबई महापालिका (BMC) सतर्क झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत गोवरची आतापर्यंत 29 प्रकरणं समोर आलीत. या आजारात मुलांना ताप आणि डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणं दिसतात. गोवर हा एक संसर्गजन्य रोग आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने तो पसरतो. या मुलांचा शवविच्छेदन अहवाल येणं अजून बाकी आहे. त्यामुळे या मुलांचा मृत्यू गोवरमुळेच झाला की नाही हे स्पष्ट होणार आहे.