मोठी बातमी! मुंबईतील विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांची 'मातोश्री'तील चर्चा संपली, उद्धव ठाकरेंनी काय निर्णय घेतला?

Maharashtra Vidhan Sabha Election: मुंबईतील ज्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्या जागांसंदर्भात आज मातोश्रीवर चर्चा सुरु आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 21, 2024, 03:05 PM IST
मोठी बातमी! मुंबईतील विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांची 'मातोश्री'तील चर्चा संपली, उद्धव ठाकरेंनी काय निर्णय घेतला? title=
शिवसेनेचे इच्छुक उमेदवार

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत येथे पाहायला मिळणार आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची यादी येणे बाकी आहे. या यादीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विरोधकांसोबत पक्षातील नेतेही या यादीची वाट पाहत आहेत. कारण कोणाला उमेदवारी मिळणार? कोणाची जागा जाणार? हे सर्व यातून उघड होणार आहे. दरम्यान शिवडी मतदार संघातून आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी हे ठाकरेंच्या शिवसेनेतून लढण्यास इच्छुक आहेत. उद्धव ठाकरे यांनी या दोघांसोबत बैठक घेतली. यात पुढे काय झाले? जाणून घेऊया.

मुंबईतील ज्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्या जागांसंदर्भात आज मातोश्रीवर चर्चा सुरु आहे. चेंबूर, शिवडी, भायखळा,कुर्ला,मागाठाणे,घाटकोपर पश्चिम इथल्या उमेदवारीचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार अजय चौधरी, आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या उमेदवारीसंदर्भात आज निर्णय होणार आहे. 

भायखळा विधानसभा मतदारसंघात रमाकांत रहाटे,मनोज जामसुतकर,किशोरी पेडणेकर यांची नावे चर्चेत आहेत. शिवडी मतदार संघात अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यात चर्चा सुरु आहे. 
चेंबूर मतदार संघाच प्रकाश फातर्पेकर आणि अनिल पाटणकर यापैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. 

कुर्ला विधानसभा मतदार संघातून प्रविणा मोरजकर,घाटकोपर पश्चिममधून सुरेश पाटील,संजय भालेराव यांचे तर मागाठाणे विधानसभा मतदार संघातून संजना घाडी, उदेश पाटेकर यांचे नाव चर्चेत आहे. 

शिवडीतून इच्छुक असलेले आमदार अजय चौधरी, सुधीर साळवी मातोश्रीतून एकत्र बाहेर आले आहेत. या दोघांशीही उद्धव ठाकरेंनी बराच वेळ चर्चा केली. परंतु या बैठकीनंतर कोणता निर्णय जाहीर करम्यात आला नाही. त्यामुळे उमेदवार निश्चिताचा निर्णय लांबणीवर केला आहे.दरम्यान आज रात्रीपर्यंत उद्धव ठाकरे निर्णय घेवू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. चेंबूरचे स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर तसेच अनिल पाटणकर मातोश्रीमधून बाहेर आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंशी उमेदवारीबाबत चर्चा केली. दोघेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत.