अशोक चव्हाण यांच्यानंतर पुन्हा धक्का! काँग्रेस आणि शरद पवार गटाचे 'हे' नेते भाजपाच्या वाटेवर?

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहिला मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यानंतर आता काँग्रेस आणि शरद पवार गटाते आकखी दोन नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 19, 2024, 01:52 PM IST
अशोक चव्हाण यांच्यानंतर पुन्हा धक्का! काँग्रेस आणि शरद पवार गटाचे 'हे' नेते भाजपाच्या वाटेवर? title=

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेरपाहिला मिळतोय. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण Ashok Chavan) यांनी भाजपात (BJP) प्रवेश करत मोठा धक्का दिला. विशेष प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासात त्यांना राज्यसभेचं बक्षीसही मिळालं त्यानंतर आता काँग्रेस आणि शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) आणखी दोन नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्यात. अशोक चव्हाणांनंतर जयंत पाटलांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्यात.

कोण आहेत जयंत पाटील?
जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत.  सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत.  1990 पासून जयंत पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते. जयंत पाटील यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जयंत पाटील यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलं आहे. 

विजय वडेट्टीवर भाजपच्या वाटेवर 

दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार  (Vijay Wadettiwar) भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याला कारण ठरलंय ते भाजप आमदार नितेश राणेंचं एक विधान.अकोल्यात नितेश राणेंच्या सभेनंतर वडेट्टीवारांनी टीका केली होती. आपल्या ट्विटमध्ये वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा. पोलिस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही.
महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का? महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी की गॅरंटी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा ? असे सवाल वडेट्टीवर यांनी उपस्थित केले होते. 

नितेश राणे यांचं प्रत्युत्तर

त्यावर नितेश राणेंनी लवकरच तुमचा आणि आमचा बॉस एकच असेल असं ट्विट केलं.. सोबत वडेट्टीवार ओरिजिनल हिंदुत्ववादी आहेत असंही नितेश राणेंनी म्हटलंय. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, कोणी केला महिलेंचा अपमान ?  हिंदू भगिनी ना love जिहाद च्या नावाने फसवले जाते तेव्हा तुम्ही कधी बोलताना दिसत नाही..विरोधी पक्ष नेता हा फक्त एका धर्मा च्या बाजुने बोलणारा नसतो..हे लक्षात असून दे.. MVA च्या काळात पोलिसांकडून वसुली करताना तुमच्या सरकारला पोलीसांची काळजी वाटली नाही का ?  असो.. आपण original हिंदुत्वादी आहात..आणि आमचे जुने सहकारी पण.. काय माहीत तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल..'

राजकारणात काहीही होऊ शकतं
मोदींना साथ देण्यासाठी कुणीही येऊ शकतं असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केलंय.मोदींना साथ देण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत असंही बावनकुळे म्हणालेत.