मुंबई : 9 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांना काही सूचना दिल्या आहेत. (Cm Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis instruction to new Ministers)
खाते वाटप लवकरच होणार आहे. त्यामुळे दिल्या जाणाऱ्या खात्याचं काम व्यवस्थित करा. तसेच वादापासून लांब राहण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत. वादग्रस्त विधाने आणि भूमिका टाळा अशा सूचना ही देण्यात आल्या आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कॅबिनेट बैठक संपल्यानंतर सर्व सचिवांना ही काही सूचना देण्यात आल्या. मंत्री मंडळात समावेश नाही, यावरून काहीजण बाहेर नाराजी व्यक्त करतात अशातच विनाकरण वाद वाढवू नका अशा सूचना देखील करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आधीच मंत्रिमंडळात वादग्रस्त आमदारांना मंत्रीपद दिल्याने विरोधक टीका करत आहेत. संजय राठोड आणि अब्दुल सतार यांना मंत्री केल्याने काही जण नाराजी व्यक्त करत आहेत.
संजय राठोड हे ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते. पण एका प्रकरणात ते वादात अडकले. पुण्यात पूजा चव्हाण या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यांच्या काही ऑडिओ क्लिपही समोर आल्या होत्या. त्यानंतर भाजपने राठोड यांच्या राजीनामा मागितला होता. अखेर 28 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
अब्दुल सत्तार हे देखील सध्या वादात अडकले आहेत. त्यांच्या मुलींची नावे टीईटी घोटाळ्यातील यादीत असल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली. टीईटी घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे.