Shocking! मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय हॅटमॅन; Viral Video मुळे एकच खळबळ

Viral Video : घराबाहेर पडण्यापूर्वीही दोन वेळा विचार करावा लागतोय, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल. नेमकं सत्य काय? 

Updated: Nov 12, 2022, 10:02 AM IST
Shocking! मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय हॅटमॅन; Viral Video मुळे एकच खळबळ title=
Hatman killer threat in mumbai because of viral video

Mumbai News : मुंबईत हॅटमॅन किलर वावरतोय, सावध राहा... असं तुम्हाला कुणीतरी हल्लीच्या दिवसांमध्ये सांगितलं असेल. त्यासंबंधीचा व्हिडीओही व्हायरल होत असल्याचं तुम्हाला सांगितलं असेल, कुणी तसा व्हिडीओही दाखवला असेल. पण, त्याबाबतचीच धक्कादायल माहिती समोर आली आहे. त्यामुळं हे वृत्त इतर कुणाला सांगण्यापूर्वी त्यासंबंधीची सविस्तर माहिती करुनच घ्या. (Mumbai Viral video)

मुंबईत नेमकं काय सुरुये? 

सध्या एका मुंबईतील (Hatman Killer) हॅटमॅन किलरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण मुंबई पोलिसांनी मात्र हॅटमॅन किलरचं वृत्त फेटाळून लावलंय. या व्हायरल व्हिडिओवर विश्वास ठेऊ नका असं आवाहनही मुंबई पोलिसांनी केलं आहे. 

Video मध्ये नेमकं काय? 

व्हिडीओमध्ये एक महिला कारमधून उतरताना दिसते तितक्यातच हा हॅटमॅन पाठीमागून तिच्यावर चाकूने वार करतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या महिलेला मग तो ओढत बाजुला नेते. या हल्लेखोरानं काळ्या रंगाचा कोट आणि टोपी घातल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय. 

वाचा : सावधान ! गोवरपासून तुमच्या मुलांना सांभाळा, 3 बालकांच्या मृत्यूचा संशय

ही घटना 5 नोव्हेंबरला मुंबईच्या अंधेरीत घडल्याचं म्हटलं जात होतं, किंबहुना आहे. इतकंच काय, तर #HatmanKillerInMumbai असा हॅशटॅगही सुरु झाला आहे. हॅटमॅनपासून सावध राहण्याचा सल्लाही सोशल मीडियावर देताहेत. पण, या अफवा असल्याचं म्हणत (Mumbai Police) मुंबई पोलिसांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय. 

अखेर सत्य समोर... 

प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय त्यांनी हे आणि तत्सम कोणतंही प्रकरण आणि त्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. मुंबईत कोणत्याही महिलेची हॅटमॅनकडून हत्या झालेली नाही, त्यामुळे या व्हायरल व्हिडिओ विश्वास न ठेवण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. त्यामुळं तुम्हालाही असा व्हिडीओ कोणी दाखवला तर तो चुकूनही फॉरवर्ड करू नका. काळजी घ्या!