मुंबई : मशिदींवरील भोंग्यावरुन अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा झणझणीत टीका केली आहे. 'अल्टिमेटम देणारे गॅलरीत बसतात आणि केसेस मात्र कार्यकर्त्यांवर होतात', असा टोला अजित पवार यांनी हाणला आहे.
'कार्यकर्त्यांची धरपकड होते आणि हे गॅलरीत फिरतात' अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
शाहू , फुले, आंबेडकर यांच्या नावाने ओरडणारे आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. लोकशाहीमध्ये संविधान महत्वाचं आहे. असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधी ही राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. 'हे सरकार कायदा, नियम आणि संविधानाने चालते. कायदा हातात घेण्याचं धाडस कोणीही करु नये.' 'महाराष्ट्रात कोणीही अल्टिमेटमची भाषा करू नये' असा इशारा अजित पवारांनी दिला होता.
राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नोटीस बजावली होती. हनुमान चालिसा लावण्याच्या तयारीत असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं.