मुंबई : रेखा म्हणजे नेहमीच चर्चेत राहणारं व्यक्तिमत्त्व अभिनेत्री म्हणून रेखाला चाहत्याचा जसा गराडा पडतो, तसचं रोका भोवती वादही नेहमीच पाहायला मिळतो. खासदार निधीची रक्कम देण्यावरुम रेखा भोवती पुन्हा एकदा वादाचे पड वाजू लागलेत.
चाफा बोलेना हे अजरामर भावगीत रेखावर चित्रितही झालेलं नाही, तिनं ते गायलेलंही नाही. मग ही काय भानगड आहे ? असा प्रश्न आपसुकच पडतो. तर सध्या रेखा आणि चाफा यांची बरीच चर्चा सुरू आहे. खासदार रेखा यांचा हट्ट या सर्वाला कारणीभूत आहे.
रेखा यांचा बंगला असलेल्या बँडस्टँड या भागात चाफ्याची झाडं लावली तरच खासदार निधी देऊ अशी अट रेखानं घातलीय. यावर स्थानिकांनी रोष व्यक्त केलाय.
समुद्रकिना-याचा परिसर खारट परिसर असल्यानं चाफ्याच्या फुलांची वाढ खुंटते. तर दुसरीकडे फक्त एकाच प्रकारच्या फुलांची झाडं हवीत कशाला ? आणि खासदार निधी देण्यासाठी अशाप्रकारचा हट्ट धरणं बरोबर आहे का ?, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.
खरतरं खासदार निधी कुठे अणि कसा खर्च करायचा याचा अधिकार संबंधित खासदारांना असतो. मात्र ज्या लोकांसाठी हा खासदार निधी वापरायचा, त्यांची मत लक्षात घेणं गरजेचं आहे. समुद्रकिनारी बंगला... बंगल्याच्या समोर गार्डन.... गार्डनच्या समोर समुद्र.....
हे सगळं रेखानं कमावलंच आहे. पण आता रस्त्यावरही चाफ्याचीच झाडं हवीतं. हा हट्ट उमराव जानला शोभत नाही असंच म्हणावं लागेल.