Devendra Fadnavis : महायुतीचं सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी वाढल्यात. गेल्या पाच वर्षांत एकमेकांना टाळणाऱ्या फडणवीस ठाकरेंच्या वारंवार गाठीभेटी होऊ लागल्यात. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत आहेत. यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे महायुतीत सहभागी होऊ शकतात अशी चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार का? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबईत झी न्यूजचा 'रिअल हिरोज' पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. विविध क्षेत्रातील यशस्वी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेण्यात आली.उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना यावेळी विचारण्यात आला.
उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते देवेंद्र फडवीस यांचे कौतुक करत आहेत. काही कौतुकांकडे दुर्लक्ष करायचं असतं. कौतुकांबाबत सतर्क रहायचे असते. अनेकदा राजकारणात फुट पाडण्यासाठी अशा प्रकारे कौतुक केल जाते. राजकारणात एक लक्षात घेतले पाहिजे की कोणी कितीही कौतुक केले तरी आपले पाय जमीनीवर असले पाहिजेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेना UBTकडून होणा-या कौतुकावर अशा कौतुकापासून सावध राहणं गरजेचं असल्याचं देखील म्हटलंय.
तिन खुर्च्यांचे स्थान मजबूत आहे. यामुळे चौथ्या सहकाऱ्याची आम्हाला गरज नाही. आमची महायुती मजबूत असून शेवटपर्यंत महाराष्ट्रात महायुतीच राहील असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे आणि महायुतीचे दरवाजे बंद असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी 24 तास काम केले. सत्ता स्थापन करताना काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी चर्चा कराव्या लागतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप तिघांना एकमेकांचा फायदा झाला.
देश सेवा आणि समाज सेवा असा मंत्र मला लहानपणापासुनच संघाकडून मिळाला आहे. आम्हाला मिळालेले पद हे पद नसून ती एक जबाबदारी आहे. मी उत्तराधिकारीच्या यादीत नाही. मात्र, पंत प्रधान नरेंद्र मोदी ज्या विचाराचे आहेत. त्या विचारांचा वारसदार मी आहे.