पावसानं दडी मारल्यामुळे धरणांचा पाणीसाठा घटला

पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातल्या धरणांचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावला आहे.

Updated: Jun 21, 2017, 06:20 PM IST
पावसानं दडी मारल्यामुळे धरणांचा पाणीसाठा घटला  title=

मुंबई : पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातल्या धरणांचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस परतला नाही तर राज्यात मोठ्या  प्रमाणात पाणीटंचाईला तोंड द्यावं लागणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये २ लाख ६२ हजार एमएलडी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तो आणखी ७० दिवस पुरू शकेल. पुण्याला पाणीपुरवठा कऱणाऱ्या धरणांमध्ये ९.८२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच तारखेला पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये ५.८५ टक्के पाणीसाठा होता.

तर नाशिकमध्ये जिल्ह्यातल्या सर्व धरणातला पाणीसाठा १३ टक्क्यांवर आलाय. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हा पाणीसाठा दहा टक्क्याने जास्त असला तरी भविष्यात पावसाने ओढ दिल्यास मोठ्या जलसंकटाची शक्यता आहे.