Vande Bharat Express News In Marathi : वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा या ट्रेनची अशीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावेळीची घटना खळबळजनक उडवणारी आहे. जगात सिगारेट आणि विडि ओढणार्यांची संख्या कमी नाही. सिगारेट ओढणारे लोक जगाच्या कानाकोपऱ्यात दिसून येतात. ही माणसे तलफ लागल्यास अगदी कुठेही सिगारेट पिऊ शकतात. अशाच एका सिगारेटमुळे 100 कि.मी.च्या वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये गोंधळ उडाला. सिगारेटच्या धुरामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
छत्रपती संभाजीनगरहून ताशी 100 कि.मी.च्या वेगाने मुंबईकडे धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला एक सिगारेटमुळे थांबावे लागले. एका बोगीत अचानक अलार्म वाजू लागतो आणि काही अंतरावर जाऊन ही रेल्वे उभी राहिली. आगीच्या भीतीने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. परंतु हा सगळा प्रकार सिगारेटच्या धुरामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नाशिक रेल्वे स्टेशन काही अंतरावर असताना मंगळवारी (9 जानेवारी 2024) ही घटना घडली. मुंबईहून रवाना झाल्यानंतर वंदे भारत नाशिक रेल्वे स्थाकावर दाखल होणार होती. तेवढ्यातच काही अंतरावर सी-5 या बोगीतील सायरन जोरजोराने वाजू लागलाच. काही अंतरावर जाऊन रेल्वे उभी राहिली. तिकीट निरीक्षक, रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोगीत येऊन विचारपूस केली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे जवानही आले. माहिती मिळत नसल्याने सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. तेव्हा एका प्रवाशाने बाथरूममध्ये सिगारेट ओढल्याने हा प्रकार घडल्याचे पुढं आले. या प्रवाशाला नाशिक रेल्वे स्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाने उतरवून घेतले.
रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ प्रवाशाला ताब्यात घेतलं. हे प्रकरण थंड झाल्यानंतर वंदे भारत रेल्वे रवाना करण्यात आली. सध्या या घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ट्रेनमध्ये निर्माण झालेलं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
देशभरात 'मेक इन इंडिया' मोहिमेअंतर्गत ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. विशेषतः या ट्रेनची प्रवासी वाहण्याची क्षमता शताब्दी एक्स्प्रेस पेक्षा अधिक आहे. पहिला वंदे भारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते कटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर आणि सहावी बिलासपूर ते नागपूर सुरू करण्यात आली आहे.
वंदे भारतच्या पहिल्या टप्प्यात 75 रेकची निर्मिती होणार असून त्यात सीट अधिक आरामदायी बनवल्या आहेत. ही ट्रेन वीजेवर धावणारी असल्याने पॉवर जनरेटर कार जोडायची गरज राहत नाही. त्यामुळे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता शताब्दी पेक्षा जादा आहे. एकूण प्रवासी क्षमता 1128 आहे.