Urfi javed on Chitra Wagh : कायम सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी मॉडेल उर्फी जावेद आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आली आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी फैलावर घेतलं होतं. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांना उर्फीला बेड्या ठोकण्याची मागणी केली होती. आता हे प्रकरण वाढताना दिसत असून उर्फी जावदने चित्रा वाघ यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. (Urfi Javed reply to Chitra Wagh latest marathi news)
सध्याच्या राजकारण्यांना पाहून वाईट वाटतं. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट केलं जात आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष दिला जातोय. समाजामध्ये आणखी काही मुद्दे आहेत, बेरोजगारी, लाखो बलात्काराच्या केसचे निकाल प्रलंबित आहेत त्याचं काय? असा सवाल उर्फी जावेदने केला आहे. उर्फीने चित्रा वाघ यांच्या ट्विटला रिप्लाय देत निशाणा साधला आहे.
So sad to see politicians today . targeting me to be in public eye . Blaming my clothes for rapes , so convenient . It’s always the victims clothes . Aur bhi mudde hai jaise unemployment , lakhs of pending rape cases , murders . Uska kya ?
— Uorfi (@uorfi_) December 31, 2022
माझ्यावर टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या महिलांना खरंच प्रत्यक्ष मदतीची गरज आहे त्यांना तुम्ही का मदत करत नाही. महिलांचं शिक्षण, लाखो बलात्काराची प्रलंबित प्रकरण यावर आपण का बोलत नाही, असं उर्फी जावेदने म्हटलं आहे.
चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?
शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत, रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला
मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये