उदयनराजे - रामराजे वाद पेटला, साताऱ्यात रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

पाणी प्रश्नावरून सातारा जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.  

Updated: Jun 15, 2019, 09:01 PM IST
उदयनराजे - रामराजे वाद पेटला, साताऱ्यात रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन   title=

सातारा : पाणी प्रश्नावरून सातारा जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. समोपचाराच्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. खासदार उदयनराजे भोसले बैठकीतून अर्ध्यातून उठून निघून गेले. त्यानंतर साताऱ्यात जोरदार पडसाद उमटलेत. रामराजे नाईक निंबाळकर यांचा खासदार भोसले समर्थकांनी जोरादर निषेध व्यक्त केला. त्याचवेळी त्यांच्या प्रतिकृती पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यामुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण होते.

विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे, खासदार रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर  जोरदार टीका केली. सातारा जिल्ह्यात जोपर्यंत तीन पिसाळलेली कुत्री आहेत तोपर्यंत माझी भूमिका सुध्दा पिसाळलेलीच असेल, अशी खालच्या पातळीवरची टीका केली. तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत, अशा थेट इशारा राष्ट्रवादीला निंबाळकर यांनी दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादावर पडदा टाकण्यासाठी बैठक बोलावली. मात्र, या बैठकीत तोडगा निघाला नाही. तर वादात अधिक भर पडली. खासदार उदयनराजे भोसले बैठकीतून अर्ध्यातून उठून निघून गेले.

 

नीरा-देवधरच्या पाण्यावरून सातारा जिल्ह्यात राजकारण आता पेटलेले दिसून येत आहे. दरम्यान, विधानसभेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. रामराजेंनी उदयनराजेंवर स्वयंघोषित छत्रपती म्हणून टीका केल्यानंतर उदयनराजे भोसले समर्थकांनी शनिवारी दुपारी पोवई नाक्यावर रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. 

छत्रपतींबाबत सातारा जिल्हात नव्हे तर राज्यात कोणीही अपशब्द काढल्यास त्याला सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी पोलिसांनी नितीन शिंदे, संतोष घाडगे यांना ताब्यात घेतले.