Nagpur Crime News : रात्री जिवंत असलेली व्यक्ती सकाळी मृत आढळली आहे. नागपुरमधे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरात दोन व्यक्तीचे मृतदेह आढळले आहेत. घरात सर्वत्र घूर दिसत असल्याने श्वास गुदमरुन यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत व्यक्तींचे नातेवाईक घरी आले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
नागपूरच्या इमामवाडा परिसरात ही घटना घडली आहे. एका घराच्या खोलीला आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून 2 मजुरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आग विझवण्यात यश आलं असून, अग्निशमन दलासह पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. आनंद पब्लिक स्कूलच्या बाजूला असलेल्या खोलीत ही दुर्घटना घडली. दोघेही मजूर मध्यप्रदेशचे राहणारे होते.
प्राथमिकदर्शी आगीमुळे यांचा मृत्यू झाल्याचे दिसत असले तरी यांच्या मृत्यूला हे दोघेच जबाबदार आहेत. कारण रात्री हे झोपेत असताना ही आगीची दुर्घटना घडली. दोघेही गाढ झोपेत होते. यामुळे आग लागल्याचे त्यांना कळालेच नाही. आगीमुळे खोलीत धुर झाला होता. धुरात गुदमरुन यांचा मृत्यू झाला असावा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सकाळी दोघांचे नातेवाईक घरी आले असता त्यांनी दरवाजा वाजवला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद आला नाही. यामुळे त्यांनी खिडकीतून पाहिले असता खोलीत धूर दिसला. नातेवाईकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. दरवाजा तोडला असता खोलीत सर्वत्र धघूर पसरला होता. धुरात श्वास कोंडून यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कल्याणमध्ये भर रस्त्यात चार जणांच्या टोळीने तलवारबाजी करत दोघांना जखमी केलय. कल्याण पूर्वेच्या चेतना परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. या हल्ल्यात अक्षय कवडे आणि अविनाश झा हे दोन तरुण जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय. दरम्यान या हल्ल्या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करा तपास सुरू केलाय. खंजीर उर्फ कुलदीप राकेश हाजरा ,मनीष चौहान आणि मुकेश हाजरा या चौघांनी भर रस्त्यात हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हे सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत.