शिंदे समितीचे मंत्रालयातील कार्यालय राष्ट्रवादीच्या मंत्र्याला दिले; मराठा आरक्षणासाठी नेमली आहे शिंदे समिती

मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या शिंदे समितीचं कार्यालय मंत्रालयातील सातव्या मजल्यावरून हलवण्यात आलं. त्यांच हे कार्यालय राष्ट्रवादीच्या मंत्र्याला देण्यात आले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 13, 2025, 04:07 PM IST
शिंदे समितीचे मंत्रालयातील कार्यालय राष्ट्रवादीच्या मंत्र्याला दिले; मराठा आरक्षणासाठी नेमली आहे शिंदे समिती title=

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या शिंदे समितीचं कार्यालय मंत्रालयातील सातव्या मजल्यावरून  हलवण्यात आल आहे.  मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्र्यांना बसण्यासाठी दालनं नसल्याने सातव्या मजल्यावरील 720, 721 आणि 722 क्रमांकाचं दालन हे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना देण्यात आलं आहे. याच जागेवर आधी मराठा आरक्षणाचं काम करणार्या शिंदे समितीचं कार्यालय होतं. पण जागेअभावी आत्ता ते इथून हलवण्यात आलं आहे.

लवकरच शिंदे समितीला एक दालन दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. पण कार्यालय प्रत्यक्षात कुठे दिलं जाणार ? मंत्रालयात असणार की बाहेर दिलं जाणार याबाबत असद्यापही स्पष्टता नाही. याबाबतची स्पष्टता कधीपर्यंत येणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मी मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात नाही. फक्त त्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसीमधून आरक्षण देऊ नका. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केलं.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. परभणीत धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जरांगे यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं..याविधनानंतर अनेक जिल्ह्यात मुंडे समर्थक आक्रमक होत मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं.. आंदोलनानंतर परळीत मनोज जरांगेंवर अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये 19 जानेवारीला  आंदोलन केलं जाणारे. मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढला जाणारेय. मात्र याच दिवशी संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर होणारे.