पुणतांबातील शेतकरी म्हणतात, आमचा लढा संपलेला नाही!

आमचा लढा अजून संपलेला नाही. तर सध्या पाऊस पाणीचा काळ पाहून आम्हीच थोडं थांबलोय, असे मत पुणतांबातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Updated: Jul 5, 2017, 07:39 AM IST
पुणतांबातील शेतकरी म्हणतात, आमचा लढा संपलेला नाही! title=

नागपूर : आमचा लढा अजून संपलेला नाही. तर सध्या पाऊस पाणीचा काळ पाहून आम्हीच थोडं थांबलोय, असे मत पुणतांबातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे अहमदनगरमधील पुणतांबातील काही शेतकऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी पुणतांबातील शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपला लढा सुरुच राहिल, अशा इशारा यावेळी त्यांनी दिला.

राज्यातील शेतकऱयांनी मोठे त्रास सहन करून कर्जमाफीचे यश मिळविले आहे. दरम्यान, विद्यमान सरकारने केलेली कर्जमाफी पुरेशी नाही. त्याचे अनेक निकष फसवे आहेत, असा दावा ही या शेतकऱ्यांनी केला.

नागपुरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने काटोलमध्ये पुणतांबातील शेतकरी सर्जेराव जाधव, बाळासाहेब चव्हाण, बापूसाहेब आढाव आणि दत्तासाहेब गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.