Shraddha Murder Case : 'आफताब तिला मारायचा, श्रद्धाला त्याला सोडायचं होतं पण...'; मित्रांनीच केला धक्कादायक खुलासा

श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत.

Updated: Nov 16, 2022, 05:15 PM IST
Shraddha Murder Case : 'आफताब तिला मारायचा, श्रद्धाला त्याला सोडायचं होतं पण...'; मित्रांनीच केला धक्कादायक खुलासा  title=

Shraddha Murder Case : मुंबईतील श्रद्धा वालकर (Shraddha Murder case) मर्डर केसनं अवघा देश हादरून गेलाय. श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत. पोलिसांनी सांगितले की, श्रद्धा व आफताब 8 मे रोजी दिल्लीत शिफ्ट झाले होते. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 18 मे रोजीच आफताबने (aftab) श्रद्धाचा मर्डर केला. तत्पूर्वी श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने जंगलाजवळील एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता. या प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे... 

दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकरचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यानं मतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले, ते फ्रिजमध्ये स्टोअर केलं. त्यानंतर दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरात जाऊन ठराविक अंतरानं टाकून दिले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या खुनाचा  उलगडा आता झाला. या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली आहे. तसेच, पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. याचदरम्यान महाराष्ट्रातील पालघरमध्ये राहत असलेल्या श्रद्धाच्या मित्रांनी एकावर एक धक्कादायक खुलासे केले आहेत. 

वाचा : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये; ‘त्या’ जंगलात आफताबबरोबर पोहोचले पोलीस 

श्रध्दाचा मित्र रजत म्हणाला की, श्रद्धाला नात्यातून बाहेर पडणे खूप कठीण झाले होते आणि तिचे जगणं नरकासारखे बनले होते. सुरुवातीला हे जोडपे आनंदाने राहत होते. नंतर त्यांच्यामध्ये खटके उडायला लागले. त्यानंतर तिला नाते तोडायचे होते. तसेच दिल्लीला शिफ्ट होत असताना त्या दोघांनी परस्पर संमतीने निर्णय घेतला होता. दिल्लीला शिफ्ट झाल्यानंतर आमचा तिच्याशी जवळजवळ संपर्क तुटलाच होतात अशी माहिती रजतने दिली. 

त्यानंतर पालघरमधील श्रद्धाचा आणखी एक मित्र लक्ष्मण नादिर याने सांगितले की, "तिने दोन महिन्यांपूर्वी माझ्याशी संपर्क साधला होता. ऑगस्टपासून तिने माझ्या एकाही मेसेजला उत्तर दिले नाही. तिचा फोन बंद होता. त्यानंतर मी तिच्या भावाला सांगितले की मी तिच्याशी जुलैमध्ये शेवटचे बोललो होतो. त्यानंतर आम्ही पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल गेली. 
 
हत्याकांडाचे मोठे अपडेट्स...

- श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पुनावाला घेऊन दिल्ली पोलिस महरौलीच्या जंगलात गेलेत. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे येथेच टाकलेत. आतापर्यंत 12 तुकडे जप्त करण्यात आलेत.
- मंगळवारी शोध मोहिमेत आढळलेले बॉडी पार्ट्स माणसाचे वाटत आहेत. न्यायवैद्यक तपासणीत त्याची पुष्टी होईल. या प्रकरणी DNA टेस्टही होईल.
- आफताबने श्रद्धाचा फोनही फेकून दिला होता. पोलिसांनी सांगितले की, शेवटच्या लोकेशनच्या माध्यमातून हा फोन जप्त केला जाऊ शकतो. सध्या त्यांना आफताबने श्रद्धाला ठार मारलेल्या शस्त्राचा शोध घ्यावयाचा आहे.
- पोलिसांनी चौकशीसाठी आफताबच्या मित्रांनाही बोलावले आहे.