पुणे : बारामतीमध्ये भरधाव गाडीखाली चिरडून दोघा शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी घडलीय.
शिवसेना बारामती शहरप्रमुख पप्पू माने याच्या इंडेव्हर गाडीखाली चिरडून समीक्षा विटकर आणि दिव्या पवार या दोघा विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर सुप्रिया लष्कर नावाची विद्यार्थिनी जखमी झालीय.
अपघातानंतर पप्पू माने आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकारानंतर संतप्त जमावानं गाडी पेटवून दिली.
फरार आरोपींना ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी बारामती-पुणे रस्ता सकाळी रोखून धरला.. कऱ्हावागज येथे घडलेल्या घटनेनं परिसरावर शोककळा पसरलीय..