नागपूर : संघाचा विजया दशमी उत्सव सुरु झालाय. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. यावेळी पथ संचलन करण्यात आले. संत निर्मल दास बाबा यांची प्रमुख आथिती असून शिवशाहीर ,बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेप्रमाणे दरवर्षी साजऱ्या करण्यात येणाऱ्या विजयादशमीच्या सोहळ्याला शनिवारी सकाळी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सुरूवात झाली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
Union Minister Nitin Gadkari, Maharashtra CM Devendra Fadnavis, LK Advani, RSS Chief Mohan Bhagwat present at #vijayadashami Utsav in Nagpur pic.twitter.com/dtupaPr9UW
— ANI (@ANI) September 30, 2017
जवळपास चार वर्षांनंतर येथे आलेल्या अडवाणी यांचे पक्षाच्यावतीनेजोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी पक्षादेशाप्रमाणे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी प्रमुख नेत्यांना फोनकरून विमानतळावर येण्याचे आवाहन केले.
#Maharashtra: RSS workers take out Route March on #Dussehra in #Nagpur, Chief Mohan Bhagwat also present. pic.twitter.com/F7WK20bO5g
— ANI (@ANI) September 30, 2017