Gunaratna Sadavarte PC Rada : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आल्याने हा गोंधळ झाला.
गुणरत्न सदावर्ते हे आज पत्रकार परिषदेत घेत होते. सोलापूर येथे पत्रकार परिषद घेत असताना सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेटचा एक कार्यकर्ता ओडरत सदावर्ते यांच्या ठिकाणी गेला आणि सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.
गुणरत्न सदावर्ते हे काल उस्मानाबादमध्ये होते. स्वंतत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी त्यांनी तिथे परिषदेचे आयोजन केले होते. कालही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला होता. आज सोलापूरमध्ये सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला आहे. पत्रकार परिषदेमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शाई फेक करण्यात आली आहे. सदावर्ते सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी सुरु होताच काही कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर शाईफेक केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले.
Live Updates :
सोलापुरात गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत राडा
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून सदावर्तेंवर शाईफेकबातमी पाहा- https://t.co/D8Fk7Ro8Gs#Maharashtra #MaharashtraPolitics #maharashtranews #zee24taas #solapur #MarathiNews pic.twitter.com/Dr1gjydEl1
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 26, 2022
दरम्यान, या शाईफेक घटनेनंतर सदावर्ते अधिक आक्रमक झाले. आज संविधान दिनी हे वागणं चुकीच आहे. आम्ही शिवरायांचे खरे मावळे आहोत. आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वातंत्रवीर सावरकर ज्या जेलमध्ये होते तिथे आम्ही उपास करुन आलेली माणसं आहोत. पाकिस्तानच्या सीमेवर आमचे भाऊ उभे असतात आणि ते पाकिस्तानला डोळे वर करून सुद्धा पाहू देत नाहीत. त्या वंशावळीतून आम्ही आलो आहोत. तेव्हा या सर्व गोष्टी आम्हाला पाणी कम चाय आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो, असे ते म्हणाले.