74 वर्षाचे पुणेकर आजोबा कॉल गर्लला भुलले, आयुष्यभराची कमाई गमावून बसले; काय घडलं नेमकं?

Pune Crime: मोबाईलमध्ये तुमचं कॉल रेकॉर्डिंग आहे अशी ज्योतीने बतावणी केली. यानंतर फिर्यादी खूप घाबरले.

Updated: Oct 22, 2023, 09:47 AM IST
74 वर्षाचे पुणेकर आजोबा कॉल गर्लला भुलले, आयुष्यभराची कमाई गमावून बसले; काय घडलं नेमकं? title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: 'अभी तो मै जवान हू!' म्हणत अनेक वयस्कर तारुण्यातील संधी पुन्हा मिळतात का? याची चाचपणी करत असतात. पण बऱ्याचदा त्यांच्या पदरी निराशाच येते. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडलाय. एका कॉल गर्लच्या संपर्कात येणे 74 वर्षांच्या पुणेकर आजोबांना महागात पडले. तुम्हाला फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत आरोपींनी पीडित आजोबांकडून 3 महिन्यात उकळले 30 लाख रुपये उकळले. 

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी 74 वर्षीय व्यक्तीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 2 जणांना अटक केली आहे.

पुणेकर 74 वर्षीय आजोबांनी जुलैमध्ये ज्योती मार्फत एका 'कॉल गर्ल'ची भेट घेतली होती. त्यानंतर फिर्यादी यांना ज्योतीचा फोन आला. पोलिसांनी "त्या" कॉल गर्लला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलीय. तिच्या मोबाईलमध्ये तुमचं कॉल रेकॉर्डिंग आहे अशी ज्योतीने बतावणी केली. यानंतर फिर्यादी खूप घाबरले. पोलिस या गुन्ह्यात तुमचेही नाव टाकतील, अशी भीती त्यांना दाखवण्यात आली. आता हा विषय संपवण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असेही आरोपीने फिर्यादीला सांगितले. पुणे पोलिसांनी याबद्दल माहिती दिली. 

आपली प्रतिष्ठा जाईल या भीतीने ज्येष्ठ नागरिकाने आरोपींना रोख आणि धनादेशाद्वारे वेळोवेळी 30 लाख 30 हजार रुपये दिले. आरोपींची हाव काही थांबत नव्हती. त्यांना दरमहा एक लाख रुपये हवे होते. इतकी रक्कम न मिळाल्यास  पोलीस कारवाई करतील, अशी धमकी आरोपींनी फिर्यादीला दिली. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून आजोबांनी पोलीस ठाणे गाठले आणि सर्व प्रकार समोर आला.