आंबेनळी घाट अपघात : यामुळे दोघांचा जीव वाचला!

पोलादपूर ते आंबेनळी दरम्यान बस दरीत कोसळली. अपघात होऊन ३३ जणांचा मृत्यू झाला. दोघे जण या अपघातातून बचावलेत. 

Updated: Jul 28, 2018, 11:11 PM IST
आंबेनळी घाट अपघात : यामुळे दोघांचा जीव वाचला! title=

रायगड : दापोली कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांची सहल दरवर्षीच शेतीचे कामे झाल्यानंतर जाते. याही वर्षी मोठ्या उत्साहात ३४ कर्मचारी महाबळेश्वरला जायला निघाले. उत्साहात त्यांनी सकाळी बस निघण्याआधी एक सगळ्यांचा फोटोही काढला. खेड येथे नास्ता केल्यानंतर पुढच्या प्रवासाला लागलेत. पोलादपूर ते आंबेनळी दरम्यान बस दरीत कोसळली. अपघात होऊन ३३ जणांचा मृत्यू झाला. दोघे जण काही कारणाने जाऊ शकले नाहीत. एकाला ताप आल्याने सहलीत सहभागी झाला नाही. 

ऋतुज कदम आणि संजय सावंत, हे दोघेही दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी. मात्र, त्यांनी सहलीला न जाता दापोलीत म्हणजे घरीच थांबलेत. ऋतुज कदमला महाबळेश्वरला सहलीला जाण्याची खूप इच्छा होती. मात्र त्याची पत्नी गरोदर असल्याने तिने त्याला न जाण्याचा आग्रह केला. तिच्या आग्रहामुळे ऋतुजने सहलीला जाण्याचा बेत रद्द केला. तर संजय सावंतही या सहलीला जाणार होता, मात्र ऐनवेळी त्याला ताप आला त्यामुळे त्यानेही त्याचे जाणे रद्द केले. त्यामुळे ते मोठ्या दुर्घटनेतून वाचलेत. अन्यथा मोठा प्रसंग त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवला असता.

आंबेनळी घाट अपघात : मृतांची नावं

महाबळेश्वरला सहलीला जाणाऱ्यांमध्ये संजय सावंत याचेही नाव होते. अपघातात सापडलेल्यांच्या यादीत त्याचे नाव देण्यात आले होते. मात्र त्याच्या नातेवाईकांनी संजय सावंत याला ताप आल्याने सहलीला गेला नसल्याचे स्पष्ट केले. ऋतुज पत्नीच्या आग्रहामुळे तर संजय सावंत ताप भरल्याने सहलीला जाऊ शकला नाही आणि या दोघांचा जीव वाचला. तर या अपघातातून प्रकाश सावंत-देसाई वाचल्याने या अपघाताची माहिती मिळाली आणि मदतकार्य गती मिळाली.