मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आता क्रिकेटच्या बुकीकडून पैसे वसूल करण्याचा आरोप लावला गेला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी परंबीर सिंगवर आरोप केला आहे की, सन 2018 मध्ये परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर मकोका कलम लावून त्यांच्याकडून 3.45 कोटी रुपये वसूल केले होते. याशिवाय सोनू जालान यांनी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही हा आरोप केला आहे.
या संदर्भात सोनू जालान यांनी डीजीपी संजय पांडे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. संजय पांडे यांनी हे प्रकरण तातडीने राज्यातील क्राइम इन्वेस्टिगेशन ब्रांचकडे सुपूर्द केले आहे. यामुळे आता परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
केतन तन्ना नावाच्या व्यक्तीनेही परमबीर सिंगवर वसूलीचा आरोप केला आहे. केतनने परंबीर सिंगवर आरोप केला की, त्याने केतनकडून 1 कोटी 25 लाख रुपये वसूल केले. याप्रकरणी परमबीर सिंगविरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांची चौकशी करावी असे सांगितले. तसेच जर ते चौकशी दरम्यान दोषी आढळले तर, त्यांच्या विरोधात कारवाई करुन मला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे.
डीजीपी संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे संजय पांडे यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यानंतर ठाकरे सरकारने परमबीर सिंग यांच्या चौकशीचे आदेश क्राइम इन्वेस्टिगेशन ब्रांचला दिले.
संजय पांडे यांना परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु संजय पांडे यांनी ही तपासणी करण्यात असमर्थता व्यक्त केली आहे. यामुळे, आता ही चौकशी सरकारने दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे.