अमर काणे, झी मीडिया, नागपूर : लहान मुलांच्या बाललीला या कायमच कौतुकाचा विषय असतो. मग ते त्यांचे बोबडे बोल असू दे किंवा त्यांनी केलेली प्रत्येक लीला. पण नागपुरातील एक चिमुकला चक्क त्याच्या हुशारीमुळे ओळखला जातोय. नागपुरातील तीन वर्षीय चिमुकला अंगद पाटील वेगवेगळ्या 50 देशांची नावे, राजधानी आणि ध्वजापासून सगळ्यागोष्टी अवघ्या काही सेकंदात ओळखतो.
तीन वर्षांच्या अंगदच्या स्मरणशक्ती आणि प्रतिभेची दखल 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' करून घेण्यात आली आहे. तीन वर्ष तीन महिन्यांच्या अंगदने 2 मिनिटे 53 सिकंदात 50 देशांचे ध्वज ओळखत त्यांच्या राजधानी सांगितल्या आहेत. या तीन वर्षीय बालकाच्या स्मरणशक्तीमुळे तो सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ज्या विक्रमाची नोंद झालीय तो विक्रम करणारा अंगद हा पहिला मुलगा आहे. ज्याने वयाच्या 3 वर्षे आणि 3 महिन्यांत हा विक्रम नोंदवला आहे, अशी माहिती अंगदचे वडील देतात.
(हे पण वाचा - .... तर तुमचं मुलं ही आईनस्टाईन! 7 लक्षणांवरुन ओळखा)
अंगदीच्या स्मरणशक्तीचा अंदाज आम्हाला फार सुरुवातीपासून होता. पण ऑगस्टमध्ये आम्ही फ्लॅगचे फ्लाश कार्ड दाखवायला सुरुवात केली. आणि ऑक्टोबरमध्ये या विक्रमाचे रजिस्ट्रेशन केले. आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने याची नोंद करुन घेतली.