वाल्मिकी जोशी, झी मीडिया, पुणे : मुक्ताईनगर विधानसभेचे शिवसेना राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान तीर्थक्षेत्र येथे थेट मंदिरात प्रवेश करून पूजा अर्चा केली. एकीकडे लॉकडाऊन पासून मंदिर तीर्थक्षेत्र बंद आहेत. मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिरसाळा हनुमान तीर्थक्षेत्रावर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांसोबत थेट मंदिरात प्रवेश केला असून शिवसेना नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लवकर कोरोना मुक्त होण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंदिरात पूजा-अर्चा केली.
मात्र एकीकडे सामान्यांसाठी मंदिर बंद आहेत मात्र सत्ताधारी पक्षाला वेगळा न्याय आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत असून सामान्यांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास तात्काळ कार्यवाही करण्यात येते मात्र आता सत्ताधारी पक्षातील आमदारांवर प्रशासन कार्यवाही करेल का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
बोदवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान मंदिर शासनाच्या नियमानुसार बंद आहे. मात्र, आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत थेट मंदिरात प्रवेश केला. एवढंच नाही तर शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लवकर कोरोनामूक्त होण्यासाठी आमदार पाटील यांनी पूजापाठ केला.
त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, राज्यात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. बोदवड तालुल्यातील शिरसाळा हनुमान मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद असताना सत्ताधारी पक्षाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज शिरसाळा हनुमान मंदिर उघडून राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनाच्या विळख्यातून लवकर सुटका होऊ दे, यायासाठी पूजाअर्चा केली.
या पूजेबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंदिराच्या बाहेर नियम पाळून पूजा केल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात आरती होत असताना स्पष्टपणे दिसत आहे तसेच कुठलीही सोशल डिस्टंसिंग व मास्क या ठिकाणी पाळण्यात आली नसल्याचेही स्पष्ट होते.
मात्र आमदारांच्या या प्रकारामुळे आमदारांची दबंग'गिरी पाहायला मिळाली. मात्र एकीकडे सर्वसामान्यांसाठी धार्मिक स्थळ तीर्थक्षेत्रे बंद आहेत मात्र सत्ताधारी पक्षातील आमदारांना वेगळा न्याय का ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.