मुंबई : Monsoon Update: मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. 48 तासांत आणखी वेगाने पावसाची प्रगती दिसून येईल. राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. (Monsoon Update: Monsoon active in Mumbai and Marathwada) तर मान्सून मराठवाड्यातही सक्रीय होणार आहे. त्यामुळे येथे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिसाला मिळणार आहे. मराठवाडामध्ये शनिवारी अनेक भागात पाऊस झाला या पावसात वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
मान्सून मुंबईत दाखल झालाय. पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मान्सूनचे वारे मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात बहुतांश भागात आणि मध्य महाराष्ट्रात दाखल झालेत. ( IMD issues red alert for Mumbai, Konkan region) पुढील 48 तासांत मान्सूनची आणखी वेगाने प्रगती होण्याची शक्यता वेधशाळेने दिली आहे. पुढील दोन दिवसांत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडामध्ये शनिवारी अनेक भागात पाऊस झाला या पावसात वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.. यात औरंगाबाद जिल्ह्यात 2 तर जालना जिल्ह्यातील 3 जणांचा समावेश आहे.. तर 3 जण जखमी झाले आहेत. मात्र गेली 2 दिवस चांगला पाऊस झाल्याने दुसरीकडे बळीराजा मात्र सुखावला आहे.
रायगडमधल्या श्रीवर्धनमध्ये सलग दोन दिवस वीज खंडित झाली आहे. तर मुरूड तालुक्यात देखील 14 तासाहून अधिक काळ वीजपुरवठा बंद होता. अनेक ठिकाणी वीजेचा लपंडाव सुरू असल्यानं जिल्ह्यात कोसळणाऱ्या पहिल्याच पावसात महावितरणच्या दाव्याचा पुरता बोजवारा उडालाय. वीज नसल्यानं नागरिकांचे हाल झाले.
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.. वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडालेत. तर शिरिशपाडा इथं विज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाला..या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नालासोपाऱ्यात सलग दहा मिनिटे पडलेल्या दमदार पावसाने वसई विरार महापालिकेच्या नालेसफाईची पोल खोल केली आहे.. शनिवारी रात्री दहा मिनिटे पडलेल्या पावसामुळे नालासोपाऱ्यातील गाला नगर परिसर पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला..एक ते दीड फुटापर्यंत पाणी या ठकाणी साचल्याने याच पाण्यातून नागरिकांना आपली वाट काढावी लागली..पावसाच्या पहिल्याच दिवसांत ही परिस्थिती असेल तर पुढचा पावसाळा कसा जाणार आहे याबाबत नागरिकांना चिंता सतावत आहे.
वाशिमच्या अडोळी परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अडोळीतल्या नाल्याला पूर आला. या पुराच्या पाण्यात अडोळी - जुमडा - गोरेगांव या आंतरजिल्हा मार्गावरील कच्चा पूल वाहून गेलाय. त्यामुळे 8 ते 10 गावांचा थेट वाशिमशी संपर्क तुटला आहे. या मुळे वाहनचालक आणि ग्रामस्थांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
अकोल्यात झालेल्या जोरदार पावसात कोट्यवधींचं खत आणि सिमेंट भिजले आहे. शिवणी रेल्वे स्थानकावर खत आणि सिमेंटच करोडो रुपयांचं खत उतरवण्यात आलं होते. मात्र रेल्वे स्थानकात शेड नसल्यानं खत आणि सिमेंट्या गोण्या पावसात भिजल्या. त्यामुळे एमआयडीसीमधील व्यापा-यांचं मोठं नुकसान झाले आहे. एकीकडे बाजारात खतांचा तुटवडा असतांना दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या गोंधळ कारभारमुळे करोडो रुपयांच खत वाया गेल्याचा आरोप या व्यापाऱ्यांनी केला आहे.