महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण

कोरोनाची सौम्य लक्षण असल्याने ते सध्या घरीच उपचार घेत आहेत.

Updated: Jul 21, 2020, 09:30 PM IST
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण title=

मुंबई : महाविकासआघाडीतील आणखी एका मंत्र्यांला कोरोनाची लागण झाली आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षण असल्याने ते सध्या घरीच उपचार घेत आहेत. लीलावती रुग्णालयात प्राथमिक उपचारनंतर सत्तार हे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.

सोमवारी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला होता. आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी दौरा केला आहे. यामुळे ते अनेकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या काळात अनेक नेते, आमदार, खासदार आपल्या भागातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दौरा करत आहेत. त्यामुळे नेत्यांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग होत आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून अनेकांनी त्यावर मात देखील केली आहे.