मुंबई : आज राज्यात ६०,२१२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज २८१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मतृयदूर १.६६% एवढा आहे. रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्यापासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. उद्यापासून 15 दिवस राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे.
मुंबईसाठी आजही दिलासादायक बाब समोर आली आहे. आजही नव्या रूग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त आहे. (कोरोना व्हायरस : उद्यापासून 15 दिवस संचारबंदी लागू - मुख्यमंत्री)
60,212 fresh COVID19 cases have been reported in the State today: Maharashtra CM Uddhav Thackeray pic.twitter.com/3oIYfoOxYU
— ANI (@ANI) April 13, 2021
मुंबईला दिलासा देणारी बाब समोर आली आहे. आज ७८९८ नवे कोरोना रूग्ण तर ११२६३ कोरोनामुक्त. २६ जणांचा कोरोनानं मृत्यू. मृत्यूच्या संख्येतही घट झाली आहे.
60,212 fresh COVID19 cases have been reported in the State today: Maharashtra CM Uddhav Thackeray pic.twitter.com/3oIYfoOxYU
— ANI (@ANI) April 13, 2021
सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सार्वजनिक वाहतूक सुरू कारण नसताना घराबाहेर पडल्यास कारवाई होणार उद्या रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार लॉकडाऊन सदृश्य निर्बंध आहेत
- उद्या रात्री ८ वाजल्यापासून अंमलबजावणी
- उद्या रात्रीपासून ब्रेक द चैनसाठी राज्यात संचारबंदी
- पुढील १५ दिवस संचारबंदी
- येणे जाणे पूर्ण बंद
- आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडायचे नाही
- अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद
- सार्वजनिक वाहतुक म्हणजे लोकल, बस व्यवस्था सुरू राहणार
- त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी वापरले जाणार
- वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतुक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार
- शीतगृह, जनावरांचे दवाखाने, शेतीची कामे सुरू राहतील - बँका, आर्थिक संस्था, अधिस्वीकृती धारक पत्रकार सुरू राहणार
- बांधकाम साईट सुरू राहणार, तिथे काम करणारे कर्मचार्यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करण्याची अट हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद, मात्र होम डिलिव्हरी सुरू राहणार
- रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार लाभार्थीना ३ किलो गहु आणि दोन किलो तांदुळ एक महिना मोफत - सात कोटी लोकांना मोफत धान्य