महाराष्ट्रात कोरोनाचा कहर; दिवसभरात ९५०९ नवे रुग्ण

देशात आतापर्यंत ११ लाख ४५ हजार ६२९ कोरोना रुग्ण बरे झाले.      

Updated: Aug 2, 2020, 09:00 PM IST
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर; दिवसभरात ९५०९ नवे रुग्ण  title=

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात ९ हजार ५०९  कोरोना रुग्ण आढळल्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. महाराष्ट्रात आता कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ४१ हजार २२८ वर पोहोचली आहे. तर २६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १५ हजार ५७६ रुग्णांना कोरोना मुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण  कोरोनाच्य विळख्यातून बाहेर पडले आहेत. 

राज्यात सध्या  १ लाख ४८ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या पुण्यात आहे. पुण्यात सध्या करोनाचे ४४ हजार २०१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ६२.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

देशात आतापर्यंत ११ लाख ४५ हजार ६२९ कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६५.४४ टक्के इतकं झालं आहे. देशातील रिकव्हरी आणि डेथ रेशियो ९६.८४ टक्के : ३.१६ टक्के इतका झाला आहे.