Cabinet Expansion: ठरलं! शिंदेंचे 'हे' 12 आमदार होणार मंत्री, 6 नव्या चेहऱ्यांना संधी; पाहा Final List

Maharashtra Cabinet Expansion: राज्यात आज खातेवाटपाचा तिढा सुटणार आहे. आज एकूण 43 मंत्री शपथ घेणार आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांची पहिली यादी समोर 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 15, 2024, 01:00 PM IST
Cabinet Expansion: ठरलं! शिंदेंचे 'हे' 12 आमदार होणार मंत्री, 6 नव्या चेहऱ्यांना संधी; पाहा Final List  title=
Maharashtra Cabinet Expansion Eknath Shinde Shiv Sena Ministers List Final

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा आज दुपारी 4 वाजता विस्तार होणार आहे. नागपुरच्या राजभवनात महाराष्ट्रातील मंत्री शपथ घेणार आहे. आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सकाळपासूनच तिन्ही पक्षातील नेते नागपूरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांची वर्णी लागली आहे, याची नावे अखेर समोर आली आहेत. आज एकूण 42 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यात 20 भाजपचे मंत्री, 12 शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. शिवसेनेच्या 12 मंत्र्यांची यादी समोर आली आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 11 मंत्री आणि स्वतः एकनाथ शिंदे असे एकूण 12 मंत्री शपथ आज राजभवनात घेतील. शिंदेंच्या टीममध्ये जुम्या मंत्रिमंडळातील काही नेत्यांचा समावेश आहे तर काहींना डच्चू देण्यात आला आहे. तर काही नवीन शिलेदारांनादेखील संधी देण्यात आली आहे. वरिष्ठ नेतृत्वाने आमदारांना स्वतः फोन करुन मंत्रीपदाची माहिती सांगितल्याचे समोर येत आहे. 

जुम्या मंत्रिमंडळातील तीन आमदारांना यंदा डच्चू देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. तर, सहा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर, पाच मंत्री हे जुन्याच मंत्रिमंडळातील आहेत. शिवसेनेला एकूण 12 खाती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या 12 मंत्र्यांची संपूर्ण यादी आज आपण जाणून घेऊया. 

1) एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
2) उदय सामंत
3) प्रताप सरनाईक
4) भरत गोगावले
5) शंभूराज देसाई
6) आशिष जैयस्वाल
7) गुलाबराव पाटील
8) संजय राठोड
9) संजय शिरसाट
10) दादा भुसे
11) प्रकाश आबिटकर
12) योगेश कदम