एक्झिट पोलनंतर सट्टा बाजारात कुणाचा आकडा? सट्टेबाजांच्या अंदाजाने दिग्गजांना फुटला घाम!

Maharashtra politics : राज्यात कुणाचं सरकार येणार याची उत्सुकता ताणलेली असताना आता मात्र सट्टाबाजारातही सरकार कुणाचं येणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जाणून घेऊया सट्टा बाजारात काय अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Nov 21, 2024, 07:00 PM IST
एक्झिट पोलनंतर सट्टा बाजारात कुणाचा आकडा? सट्टेबाजांच्या अंदाजाने दिग्गजांना फुटला घाम!

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. आता प्रतिक्षा आहे ती निकालाची. राज्यात कुणाचं सरकार येणार याचा निर्णय 23 नोव्हेंबरला लागणार आहे. मात्र, त्या आधीच राजकीय नेत्यांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.  त्यातच आता सट्टाबाजारातही सरकार कुणायचं येणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सट्टाबाजारांचा कौल कुणाला? कुणाली किती जागा मिळणार जाणून घेऊया. 

एक्झिट पोलनंतर सट्टा बाजारातही महायुतीलाच कौल देण्यात आला आहे. फलोदी सट्टाबाजारात भाजप आणि मित्रपक्षांना 140 ते 142 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, महाविकास आघाडीला 128 ते 130 जागा मिळण्याची शक्यत आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचं अंदाज फलोदी सट्टा बाजारात वर्तवण्यात आलाय...महायुतीच्या आणि मविआला किती जागा मिळणार याचं भाकितही वर्तवण्यात आलंय..

मतदानानंतर राज्यात कुणाची सत्ता येणार याबाबत एक्झिट पोलनंतर सट्टा बाजारातसुद्धा कौल कुणाला हे समोर येतंय. निकालाआधी फलोदी सट्टा बाजारातही आकडेमोड सुरू झाली आहे.  288 पैकी भाजप आणि मित्रपक्षांना 140 ते 142 जागा मिळतील असा अंदाज सट्टा बाजारात वर्तवण्यात आला आहे. 

यात एकटया भाजपकडे  87-90 जागा असतील असा अंदाज आहे. तर मविआला   128-130 जागा मिळण्याचा अंदाज, अपक्षांना 15 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज आहं.   फलोदी सट्टा बाजारात महायुतीला 40 पैसे भाव तर, मविआला  2 ते  2.50 रूपये  भाव मिळतोय. सट्टा बाजाराच्या अंदाजाने अनेक दिग्गजांना घाम फुटल्याची चर्चा आहे.

एक्झीट पोलमधून महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय... तसाच अंदाज सट्टा बाजारातूनही व्यक्त करण्यात आलाय.. मात्र महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज आहे.. त्यामुळ सट्टा बाजाराच्या अंदाजानं दिग्गज नेत्यांना मात्र घाम फुटल्याची चर्चा आहे..