हातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि उमेदवार राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातून पराभव झाला आहे. हातकणंगलेतील मतदारांनी शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या बाजूने कौल दिला आहे. देशपातळीवर शेतकरी नेता म्हणून ओळख असलेल्या राजू शेट्टी यांचा विजय निश्चित मानला जात होता, मात्र हातकणंगलेच्या मतदारांनी त्यांना नाकारले. या मतदारसंघात शेतक-यांसोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे आपल्या विजयाची त्यांना खात्री होती. शिवसेनेने धैर्यशिल माने यांना निवडणूकीच्या मैदानात उतरवून आपले डावपेच खरे ठरवले. वंचित आघाडीने अस्लम सय्यद यांना उमेदवारी दिली होती.
हातकणंगले मतदारसंघात 12 लाख 52 हजार 211 जणांनी मतदान केले. यामध्ये स्वाभिमानी पक्षाच्या राजू शेट्टी यांना 4 लाख 87 हजार 276 मतं मिळाली तर शिवसेनेच्या धैर्यशिल माने यांना 5 लाख 82 776 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या अस्लम सय्यद यांना 1 लाख 23 हजार 151 मतं मिळाली.
11:54 AM- शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने पुन्हा आघाडीवर 17 हजार मतांची माने यांना आघाडी. राजू शेट्टी पुन्हा पिछाडीवर
9:34 AM- पहिल्या फेरीअखेर शिवसेनेचे धैर्यशील माने आघाडीवर माने यांना 35058 मते तर खासदार राजू शेट्टी यांना 35004 मते
9.08am- खासदार राजू शेट्टी 54 मतांनी पिछाडीवर
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
राजू शेट्टी | स्वा. शे. संघटना | 640428 |
कल्लापा आवाडे | काँग्रेस | 462618 |
सुरेश पाटील | अपक्ष | 25648 |
चंद्रकांत कांबळे | बसपा | 11499 |
नोटा | नोटा | 10059 |
२०१४ साली राजू शेट्टी यांना ६ लाख ४० हजार मतं मिळाली होती. कल्लाप्पा आवाडे यांचा १ लाख ७७ हजार मतांनी पराभव झाला होता.