LIVE Updates on November 28 महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
28 Nov 2024, 09:28 वाजता
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांचे आजपासून क्रमांक बदलले
Dadar Local Railway Station: उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल-एक्स्प्रेसची सेवा व्यवस्थित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दादर स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल केल्याची घोषणा केली. बुधवार, २७ नोव्हेंबरपासून फलाट क्रमांक १० ऐवजी फलाट क्रमांक ‘९ ए’ आणि फलाट क्रमांक ‘१० ए’ ऐवजी फलाट क्रमांक १० म्हणून ओळखला जाईल.
28 Nov 2024, 09:02 वाजता
राज्यात वाढला थंडीचा जोर, पुणे शहर गारठलं; नोंदवले गेले सर्वात नीचांकी तापमान
Maharashtra Weather News: यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दहा अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली असून, थंडीमुळे रात्रीबरोबर दिवसाही हुडहुडी जाणवू लागली आहे. पुढील काही दिवस तापमानात घट होत राहणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार एनडीए पुण्यात (Pune) हंगामातील नीचांकी तापमान नोंदवले गेले. एनडीए येथे ८.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर हवेली येथे ९.९, शिवाजीनगर येथे ९.९, पाषाण येथे १०.२, आंबेगाव येथे ११ अंश सेल्सियस तापमान होते.
28 Nov 2024, 08:41 वाजता
आज एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांची दिल्लीत बैठक
BJP meeting in Delhi today: आज एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्राची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांशी दिल्लीत भेट घेणार आहे. दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सर्व खासदार आज दिल्लीत आहेत.
28 Nov 2024, 08:11 वाजता
डोंबिवलीमध्ये शुक्रवारी एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद
Dombivli water supply cut: जांभूळ जलशुद्धिकरण केंद्र व बारावे गुरुत्वावहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम शुक्रवारी २४ तास करण्यात येणार आहे. या कामामुळे एमआयडीसी, कल्याण डोंबिवली तळोजा, डोंबिवली महापालिकेचा काही भाग, उल्हासनगरचा काही भाग, आदी ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. शनिवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले.
28 Nov 2024, 07:51 वाजता
मुंबई आणि उपनगरात सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले
Cold cough patients increased in Mumbai: शहरात मागील काहीदिवसांपासून तापमानाचा पारा घसरला असून अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. शहरातील प्रदूषणातदेखील वाढ झाली असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वाढलेल्या थंडीमुळे महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणारी रुग्णांची गर्दी वाढली आहे.
28 Nov 2024, 07:33 वाजता
CET Exam सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
Education News: राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे सीईटी संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. त्यानुसार, शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये अभियांत्रिकीसह औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी, अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ९ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4