Maharashtra Breaking News LIVE Updates: एकनाथ शिंदे अमित शाह यांच्या घरी दाखल

LIVE Updates on November 28 महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE Updates: एकनाथ शिंदे अमित शाह यांच्या घरी दाखल

LIVE Updates on November 28 महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

 

28 Nov 2024, 21:47 वाजता

ठाकरे गटाचे माहीम दादरचे आमदार महेश सावंत रुग्णालयात दाखल

ठाकरे गटाचे माहीम दादरचे आमदार महेश सावंत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखू लागले होते. यानंतर आज लिलावती रुग्णालयात महेश सावंत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.त्यांची तब्येत स्थिर असून दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

28 Nov 2024, 21:23 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल

 

28 Nov 2024, 21:13 वाजता

अमित शहा यांच्या घरी भाजप नेत्यांच्या बैठकीला सुरूवात

भाजप बैठकीसाठी भाजपध्यक्ष जे पी नड्डा पोहोचले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी भाजप नेत्यांच्या बैठकीला सुरूवात

महायुतीच्या बैठकी अगोदर भाजप नेत्यांची राजधानी दिल्ली इथं बैठक

28 Nov 2024, 21:10 वाजता

जे पी नड्डा अमित शाहांच्या घरी पोहोचले

 

28 Nov 2024, 20:58 वाजता

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये बैठक

सुनील तटकरेंच्या घरी केली चर्चा

अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीआधी फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा

मंत्रीमंडळ स्थापनेसंदर्भात राजधानी दिल्लीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मंथन

भाजप आणि राष्ट्रवादी सत्तास्थापन करण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी महायुतीच्या बैठकी अगोदर राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांची वेगळी बैठक

राष्ट्रवादी राज्यासह केंद्रात मंत्री पद मिळवण्यासाठी आग्रही

आजच्या बैठकीत होणार निर्णय

28 Nov 2024, 19:29 वाजता

एन.डी.स्टुडिओचे परिचालन आता गोरेगाव फिल्मसीटीच्या ताब्यात

दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडिओ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी (operations) ताब्यात घेतला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन.डी. स्टुडीओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. आता एन.डी.स्टुडीओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. 

28 Nov 2024, 18:42 वाजता

अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळाली, 27  हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा

यंदा दिवाळीचा बोनस न मिळाल्यामुळे बेस्ट उपक्रमातील चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र आता दिवाळीनंतर एक महिन्याने २७ हजार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात झाली होत आहेत. दिवाळीनंतरही बोनस मिळत नसल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. या मागणी बेस्ट कर्मचाऱ्यांनी 'काम बंद' आंदोलनही केले. कर्मचाऱ्यांचा रोष लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने बेस्टच्या खात्यात 80 कोटी रुपये जमा केले.  मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बेस्ट कर्मचाऱ्यांची बोनस रक्कम मिळू शकला नाही.  गुरुवारी 27 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 27 ते 29 हजार रुपये बोनस जमा झाला, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे. 

28 Nov 2024, 17:21 वाजता

आमच्या पक्षात मागायची सवय नाही, योग्यतेनुसार जबाबदारी दिली जाते - प्रवीण दरेकर 

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनं महायुतीला बहुमत दिल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार आणि त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. भाजप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मंत्रिपदाबाबत पत्रकारांनी विचारणा केली. यावर ते म्हणाले की, 'आजवर पक्षाकडे काही मागितला नाही, त्यांनीच विधान परिषद आणि विरोधी पक्षनेते पद दिलं. आमच्या पक्षात मागायची सवय नाही योग्यतेनुसार जबाबदारी दिली जाते'. 

28 Nov 2024, 16:27 वाजता

विरोधकांचा विजय झाला की EVM चांगलं आणि हार झाली की सगळा दोष EVM ला - अजित पवार 

महाराष्ट्र निवडणुकीत झालेल्या विजयानंतर अजित पवार यांनी दिल्ली येथील पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी EVM ला दोष देणाऱ्या विरोधी पक्षांची कान उघाडणी केली. त्यांनी म्हटले, 'विरोधक सांगत होते EVM चा काहीतरी घोटाळा आहे त्यात काहीच खरं नाहीये जेव्हा त्यांचा विजय होतो तेव्हा EVM व्यवस्थित असतं आणि त्यांची हार झाली की सगळा दोष EVM ला देतात. सुप्रीम कोर्टाने पण EVM च्या विरोधाची अपील फेटाळली आहे'. 

28 Nov 2024, 16:01 वाजता

राष्ट्रवादी पक्ष दिल्लीत निवडणूक लढवणार - अजित पवार 

महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर प्रथमच अजित पवार दिल्लीत पोहोचले आहेत. अजित पवार दिल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी प्रफुल्ल पटेल यांसह राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत. यावेळी अजित पवार यांनी दिल्लीच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार असे म्हटले.