LIVE Updates on November 28 महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
28 Nov 2024, 15:33 वाजता
महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत अजित पवारांच्या पत्रकार परिषद
महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर प्रथमच अजित पवार दिल्लीत पोहोचले आहेत. अजित पवार दिल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी प्रफुल्ल पटेल यांसह राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत.
28 Nov 2024, 14:45 वाजता
निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आमचा संशय - नाना पटोले
निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आमचा संशय असल्याचे नाना पटोले म्हणाले. निवडणूक आयोगाच्या रिपोर्टची आकडेवारी उशीरा आली. ५ वाजता निवडणूक आयोगीनं ५८.२२ टक्के मतदान झालं हे सांगितलं. मात्र रात्री ११.३० वाजता ६५.२ टक्के मतदान झाल्याचं जाहिर झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक आयोगानं ६६.५ टक्के मतदान झाल्याचं कळवलं. निवडणूक झाल्यावर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेते, माहिती देते... मात्र, यंदा निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झालीच नाही.
28 Nov 2024, 14:35 वाजता
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय आज दिल्लीत होणार
महाराष्ट्राचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी 4 वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत. कालच पत्रकार परिषद घेऊन अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय आज दिल्लीत होणार असून आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांची अमित शहा यांच्याबरोबर बैठक होणार आहे.
28 Nov 2024, 13:54 वाजता
थंडीमुळे केळीची मागणी घटली शेतकऱ्यांचे नुकसान
उत्तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळी लागवड झाली असून थंडी मुळे केळीला मागणी घटल्याने शेतकरी हवालदील झाला आहे, मोठ्या प्रमाणात खर्च करून केळीच्या बागा फुलल्या असून झाडांना चांगल्या प्रकारे केळीचे घड लागले आहेत परंतु थंडी मुळे बाजारात ग्राहकांन कडून मागणी कमी होत असल्याने परिपक्व झालेली केळी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
28 Nov 2024, 13:27 वाजता
नालासोपाऱ्यात पालिकेची मोठी तोडक कारवाई, आरक्षित जागेवर बांधलेल्या 41 अनधिकृत इमारती तोडणार
Nala Sopara, Mumbai : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने नालासोपाऱ्यात ४१ अनाधिकृत इमारतींवर कारवाईला सुरूवात झाली आहे. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे परिसरातील महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर या इमारती बांधण्यात आल्या आहेत. शेकडो रहिवासी या इमारतीमध्ये वास्तव्य असल्याने या कारवाईमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होणार आहेत. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यास या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
28 Nov 2024, 13:24 वाजता
जल संधारण विभागाच्या गळथान कारभारामुळे नदी पडली कोरडी, शेतीसिंचनासाठी शेतकरी अडचणीत
वाशिम तालुक्यातून वाहणाऱ्या पूस नदीवर जलसंधारण विभागाकडून लाख रुपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले आहेत.मात्र या बंधार्यामध्ये पाणी अडवताना योग्य खबरदारी न घेतल्यानं वाघजाळी परिसरात नदीपात्र आताच कोरडे ठाण पडले आहे. त्यामुळे आता या परिसरातील रब्बी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय. जलसंधारण विभागाच्या गलथान कारभारामुळे हे बंधारे बांधण्याच्या उद्देशालाच हरताळ फासली गेली असून शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.
28 Nov 2024, 13:14 वाजता
सरकार स्थापना रखडल्याने शेतकऱ्यांनी रोखली सोयाबीन विक्री
विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव भाव देण्याचा आश्वासन दिलं होतं मात्र सरकार स्थापन व्हायचं असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल सोयाबीन घरातच ठेवला असेल सरकार स्थापन होतात दरवाढ होणार असल्याची आशा शेतकरी लावून बसला आहे त्यामुळे सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक घटल्याचा पाहायला मिळत आहे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाला असून आता सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहे दरम्यान सोयाबीनचा 4892 हा हमीभाव असून सध्या शेतकरी 3200 ते 4100 रुपये प्रतिक्विंटल ने सोयाबीन विकत आहे.
28 Nov 2024, 12:55 वाजता
अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी आम्हा सर्वांची इच्छा- रूपाली चाकणकर
Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्ता म्हणून पहिल्या दिवसापासून आम्हा सर्वांची इच्छा आहे. महायुती म्हणून जो निर्णय घेतला जाईल तो आम्हाला मान्य असेल. दोन दिवसात सर्व गोष्टी समोर येतील. दिल्लीत आज महायुतीचे तिन्ही मुख्य नेते मोदी आणि अमित शहांना भेटतील. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर मी समाधानी आहे. पुण्यातील पालकमंत्री पदासाठी काही रस्सीखेच नाही मंत्रिमंडळानंतर पालकमंत्री ठरेल पण जे ठरतील ते आम्हला मान्य असेल.
28 Nov 2024, 12:29 वाजता
फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर 'महाविजयाचे शिल्पकार' अशा आशयाचे कट आउट
Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे यांनी भाजपचा केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल त्याला आमचा पाठिंबा असेल असे स्पष्ट केले. त्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्रीपदासाठी मार्ग सुकर झालाआहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. महायुतीच्या विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहण्यात येत आहे. त्यादृष्टीने भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाबाहेर महाविजयाचे शिल्पकार अशा आशयाचे फडणवीसांचे कट आउट लावले आहेत.
28 Nov 2024, 12:03 वाजता
कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद राहणार
Thane: एमआयडीसीमार्फत जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद राहणार आहे. या बंदनंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. गुरूवार, २८ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपासून ते शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत असा २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे या काळासाठी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, तसेच, पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.