LIVE Updates on November 28 महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
28 Nov 2024, 11:51 वाजता
आळंदीमध्ये संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात, मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी
Kartiki Ekadashi Yatra 2024: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली असून मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली असून कीर्तन सुरू आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये गायिका कोमल शेलार ही ही सहभागी झाली. अभंगांच्या माध्यमातून कोमलने माऊलीं प्रति आपली भक्ती व्यक्त केली. आळंदीत संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविकांची इंद्रायणी नदीवर गर्दी केली आहे.
बघा व्हिडीओ
Alandi Ground Report | आळंदीत संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविकांची इंद्रायणी नदीवर गर्दी #alandi #devtees #sanjivansamadhisohala #zee24taas #santdnyaneshwar pic.twitter.com/yESkrhNEHP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 28, 2024
28 Nov 2024, 11:36 वाजता
अजित पवार थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दुपार नंतर दिल्लीत येणार येणार आहेत तर अजित पवार थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार आहेत. संध्याकाळी ६ नंतर अमित शाह यांच्या सोबत सगळ्यांची बैठक होणार आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे खासदार भेटणार आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मध्ये शिवसेनेचा वाटा कसा असेल यावर चर्चा होणारआहे. मुख्यमंत्री सोडण्याच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे खासदारांसोबत चर्चा करणार आहते.
28 Nov 2024, 11:20 वाजता
लोकसभेत विरोधकांचा गोंधळ, कामकाज स्थगित
Loksabha: लोकसभेत शपथविधी सुरु आहेत. प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून जिंकून आल्यावर आता शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्रातील रवींद्र चव्हाणांनी खासदारकीची शपथ घेतली. यावेळी लोकसभेत गोंधळ सुरु झाला. लोकसभेत शपथविधीनंतर विरोधकांनी गोंधळ सुरु केला. दुपारी १२ वाजेपर्यंत लोकसभेचे
कामकाज स्थगित करण्यात आले.
28 Nov 2024, 11:05 वाजता
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
Dhananjay Munde: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंढे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर निवासस्थानी दाखल झाले आहे.
28 Nov 2024, 10:49 वाजता
लग्नकार्य आटपून सांगलीला परतणाऱ्या गाडीचा अपघात, नदीच्या पात्रात कोसळली गाडी
Sangli Accident: सांगलीच्या अंकली नजीक पुलावरून नदीत गाडी कोसळल्याने तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव गाडीचा ताबा सुटल्याने थेट नदीच्या पात्रात गाडी कोसळली. मृतात दोन महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. हा अपघात रात्री 1 च्या सुमारास घडला. कोल्हापूरहून लग्नकार्य आटपून सांगलीला परतत असताना अंकलीच्या कृष्णा नदीवरील पुलावरून गाडी कोसळली. मृत कुटुंबीय सांगलीतील आकाशवाणी येथील गंगाधर कॉलनीतील रहिवाशी असल्याची माहिती आहे.
28 Nov 2024, 10:38 वाजता
दिल्लीत आज होणार मुख्यमंत्री पदाचा निर्णय, महायुतीची महत्वपूर्ण बैठक
Mahayuti Meeting: महायुतीची आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह महायुतीचे नेते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत.
28 Nov 2024, 10:18 वाजता
राज्यातील 'या' शहरातचे तापमान महाबळेश्वर पेक्षाही कमी
Maharshtra Lowest Temperature: राज्यातील अनेक शहरातील तापमान खालावले आहे. यातच आता राज्यातील एका शहराचे तापमान अगदी महाबळेश्वर पेक्षाही कमी झाले आहे. निफाडच्या ओझर मध्ये हे सर्वाधिक कमी तापमान नोंदवले गेले आहे. तिकडे 6.6°c इतक्या तापमानाची नोंद झाली आहे जी महाबळेश्वर पेक्षाही कमी आहे. यामुळे मात्र गहू हरभऱ्यांना फायदा मात्र द्राक्ष पिकाला कमी तापमानाचा फटका बसला आहे.
28 Nov 2024, 10:01 वाजता
अमरावती ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
Amravati: अमरावतीमधून धक्कादायक बातमी येत आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे रेल्वे ट्रॅक तुटला. ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. रुळाच्या जॉईट मधील वेल्डींग उखळल्याने रेल्वे ट्रॅक तुटला. पुरी अहमदाबाद सुपर एक्सप्रेस 20 मिनिट उशिरा, अनेक गाड्या उशिरा धावण्याची शक्यता आहे.
28 Nov 2024, 09:46 वाजता
राज्यातील 'या' शहरातचे तापमान महाबळेश्वर पेक्षाही कमी, 6.6°c इतक्या तापमानाची नोंद
Maharashtra Lowest Temperature : राज्यातील अनेक शहरातील तापमान खालावले आहे. यातच आता राज्यातील एका शहराचे तापमान अगदी महाबळेश्वर पेक्षाही कमी झाले आहे. निफाडच्या ओझर मध्ये हे सर्वाधिक कमी तापमान नोंदवले गेले आहे. तिकडे 6.6°c इतक्या तापमानाची नोंद झाली आहे जी महाबळेश्वर पेक्षाही कमी आहे. यामुळे मात्र गहू हरभऱ्यांना फायदा मात्र द्राक्ष पिकाला कमी तापमानाचा फटका बसला आहे.
28 Nov 2024, 09:36 वाजता
पार्थ पवारांनी ट्विट करून अमोल मिटकरींना खडसावलं, सुनावले खडे बोल
Parth Pawar: अमोल मिटकरींनी घेतलेली भूमिका पक्षविरोधी असल्याचं पार्थ पवार यांनी म्हटलंय. डिझाईन बॉक्सबाबत अमोल मिटकरी यांनी घेतलेल्या भूमिकेशी अजित पवार आणि राष्ट्रवादी सहमत नाही.त्यामुळे या वादापासून त्यांनी दूर राहवं असं पार्थ पवार म्हणाले आहेत.
बघा पार्थ पवार यांचे ट्विट
It is highly unfortunate that Mr. @AmolMitkari22 despite being a party MLC, has chosen to take an anti-party stance regarding the role of @DesignBoxed and Sh. Naresh Arora. My party and my father, Sh. @AjitPawarSpeaks, the National President of the party, categorically does not…
— Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) November 27, 2024
अमोल मिटकरींनी नरेश अरोर यांच्यावर टीका केल्यानंतर आता पार्थ पवार यांनी अमोल मिटकरींना खडे बोल सुनावलेत. अमोल मिटकरींच्या विधानाचं समर्थन राष्ट्रवादी करत नसल्याचं पार्थ पवार म्हणालते. त्यामुळे माध्यमांशी अशा प्रकारे भूमिका मांडू नये असं पार्थ पवार म्हणालते.अशा प्रकारची भूमिका घेणं अत्यंत दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.