जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती: महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सरकारच्या काळात आम्ही चांगलं काम केलं आहे पण काहींनी गद्दारी केली. त्यानंतर आमचं सरकार गेल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते (opposition leader) अजित पवार (ajit pawar) यांनी केले. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आता काहीजण गरळ ओकत आहेत. मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी महिलांबद्दल गरळं ओकली. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी राज्यपाल चुकीचे बोलले आहेत. अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोथळा काढला असे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणतात. अरे गोपीचंदा काय बोलतो? आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनी त्यांच्यावर सणाणूनन टीका केली. ते दौंड तालुक्यातील मिरवडी येथे बोलत होते. (latest political update ajit pawar comments back on gopichand padalkars statement)
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आम्ही चांगलं काम केलं आहे, पण काहींनी गद्दारी केली. त्यानंतर आमचं सरकार गेलं. आता काही वाचाळवीर बोलू लागले आहेत. काहीजण गरळं ओकत असल्याचे अजित पवार म्हणाले. कोणीही सत्तेचा माज करू नये, असेही अजित पवार म्हणाले. मागे मंत्री मंगलप्रभात लोढा बोलले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तावडीतून सुटले. सुटले कसे? एकनाथ शिंदे पळाले... आधी सुरत मग गुवाहाटी, त्यानंतर जोतिषाला हात दाखवल्याचा टोला अजित पवारांनी लगावला.
आपण शिक्षणाला देणगी दिली म्हणतो. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात भीक मागितली. तुम्ही काय बोलता? तुम्ही आमच्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. त्यामुळं आमची का बदनामी करता? असा सवाल अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांनी केला.
आपल्याकडे साखरेला 3 हजार 100 ते 3 हजार 200 चा दर दिला जातो. परदेशात तीच साखर 3 हजार 900 ते 4 हजार रुपयांनी विकली जाते. आमच्या शेतकऱ्यांना मिळू देत ना पैसे, असेही अजित पवार म्हणाले. मागच्या वर्षीची साखर अजूनही शिल्लक आहे. त्याला रोज एक रुपयाचे व्याज लागत असल्याचे पवार म्हणाले. आपला दीड लाख रोजगार निर्माण करणारा कारखाना गुजरातला नेला. ज्या पद्धतीने काम करायचे त्या पद्धतीनं सरकार काम करत नसल्याचे अजित पवार म्हणाले.