पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे ३० हजार ८८७ क्विंटल अन्नधान्याची तर ९ हजार २७२ क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात ३ हजार २६५ क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक ६ हजार ९३४ क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. तसेच पुणे विभागात १२ हजार ६७०स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करण्यात आले आहे.
पुणे विभागात बुधवारी १०१.२६० लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २३.९४६ लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे विभागात १२ हजार ६७०स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करण्यात आले आहे. सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत १२५ कॅम्प, कामगार विभागामार्फत ५६ कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत १४ कॅम्प असे पुणे विभागात एकुण १९५ रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये१२ हजार ६७० स्थलांतरित मजूर असून ७५ हजार ५६० मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.